Last Updated on 31 Jul 2025 6:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तहसीलदार सचिन पाटील यांची माहिती
सांगली । महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी “महसूल दिन” तर दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत “महसूल सप्ताह २०२५” साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग तसेच जिल्हाधिकारी सांगली यांचे निर्देशानुसार तालुका प्रशासनाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
या सप्ताहात असे उपक्रम राबविले जाणार :
१ ऑगस्ट – “महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ”
महसूल संबंधीत कार्यरत/ सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी यांना पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ
२ ऑगस्ट – शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांची अतिक्रमण नियमित करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रम.
३ ऑगस्ट – पाणंद/शिवारस्त्यांची मोजणी करून त्याच्या दुतर्फा झाडे लावणे
४ ऑगस्ट – “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळ निहाय राबवणे.
५ ऑगस्ट – विशेष सहाय्य योजनेंतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे.
६ ऑगस्ट – शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार (नियमानकुल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे
७ ऑगस्ट – “M-Sand धोरणाचे अमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यपद्धती (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ”
सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे.










































































