Last Updated on 15 Mar 2021 5:30 PM by
काय आहे Micro-SIP Schemes?
जर आपल्यालाही या योजनेत फक्त 100 रुपये गुंतवून मोठी कमाई करायची असेल तर आपण हे करू शकता. जर आपण प्रत्येक महिन्याला फक्त 100 रुपये वाचवून या योजनेत गुंतवू इच्छित असाल तर आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात.
प्रत्येकालाच आपल्या कमाईतला (Income) काही भाग (part) गुंतवायचा (invest) असतो. विशेष गोष्ट ही की आता गुंतवणुकीचे अनेक पर्याय (options) बाजारात (market) उपलब्ध आहेत ज्यामुळे आपण कमीत कमी पैसे (minimum amount) गुंतवू शकता. जर आपल्यालाही फक्त 100 रुपये गुंतवायचे असतील तर आपणही हे करू शकता. जर आपण प्रत्येक महिन्याला फक्त 100 रुपये वाचवून या योजनेत (scheme) गुंतवू इच्छित असाल तर आपल्याला चांगले रिटर्न्स (good returns) मिळू शकतात. मायक्रो-एसआयपी (micro-SIP) या योजनेद्वारे आपण हे करू शकता. हा एक म्यूच्युअल फंडच (mutual fund) आहे. जाणून घ्या या योजनेबद्दल.
या योजनेतून किती मिळू शकतो फायदा?
जर आपण दर महिन्याला 100 रुपये एसआयपी केले तर एका वर्षात आपण 1200 रुपये जमा कराल. याचा अर्थ 20 वर्षात ही रक्कम 24000 रुपयांवर पोहोचेल. आता आपल्याला जर दरवर्षी या रकमेवर 12 टक्क्यांचे रिटर्न्स मिळाले तर ही रक्कम 98,925 रुपये होईल. अशाने 30 वर्षांनंतर ही रक्कम 3.5 लाख रुपये होईल आणि 50 वर्षांत 39 लाख रुपयांवर पोहोचेल.
म्यूच्युअल फंडात स्वचालित रुपात गुंतवू शकता ठराविक रक्कम
इथे आपण आपल्या सोयीनुसार साप्ताहिक किंवा मासिक अंतराने म्यूच्युअल फंडात स्वचातिल रुपाने एक निश्चित रक्कम गुंतवू शकता. हे एका आरडीसारखे आहे. मायक्रो एसआयपी अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे गुंतवण्यासाठी मोठी रक्कम नाही. कमी वयाच्या विद्यार्थ्यांसाठीही हे उपयुक्त आहे.
500 रुपयांपासून करू शकता सुरुवात
आपण एसआयपीच्या माध्यमातून काही वर्षांतच चांगले रिटर्न्स मिळवू शकता. यासाठी आपल्याला कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक दर महिन्याला करू शकता. आनंद राठी वेल्थ व्यवस्थापकचे उपकार्यकारी अधिकारी फिरोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार जर आपण प्रत्येक महिन्याला 1000 रुपये गुंतवलेत तर आपल्याला 20 वर्षात 20 लाख रुपये मिळतील.














































































