Last Updated on 22 Jul 2020 4:58 PM by
तुमच्या दिवसाची सुरुवात उकडलेल्या अंड्यांनी करा. सकाळच्या न्याहारीदरम्यान अंडी खाल्ल्यास वजन लवकर वाढेल. अंड्यातील पांढऱ्या भागांत प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच झिंक, व्हिटॅमीन, आयर्न आणि कॅल्शियमचा स्त्रोत आहे.
सकाळचा नाश्ता : सकाळचा नाश्ताअत्यंत आवश्यक असून तो परिपूर्ण असावा. नाश्त्यामध्ये दुध, पोळी, फळे, हिरवी भाजी, दही, केळ, पपई, अंडी, इत्यादी पदार्थ खाऊ शकतात.नाश्ताभरपूर करावा.
दुपारचे जेवण : चांगल्या स्वरुपात करावे. जेवणात भात, आमटी, पोळी, भाजी असावी. पालेभाज्या अवश्य असाव्यात. हरभरे, सोयाबीन, सॅलड, इत्यादींचा समावेश असावा. रात्रीचे जेवण : रात्रीचा आहारहलक्या स्वरूपाचा असावा. रात्रीचे जेवण कमी प्रमाणात घ्यावे. जेवणात डाळ, भात, भाजी, पोळी असावी. शेंगा, मटार, डाळी, शेंगदाणे, फरसबी, अंडी, मांस, मासे, दुध, इ. पदार्थांचा आहारात समावेश असल्यास शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. भाज्या, हिरव्या पालेभाज्या, सफरचंद, पपई, संत्री, गाजर, इ. फळांचा समावेश आहारात केल्यास शरीर निरोगी राहते. तांदूळ, गहू, मका, नाचणी, बटाटा,साखर,गुळ, मांस, इत्यादी शक्ती देणारे पदार्थ आहे.
भरपूर पाणी प्या : आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे मांसपेशीची ताकद वाढवण्यासाठी पाणी गरजेचे असते. तसेच एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे.
अननस खा : जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर आहारात अननसाचा समावेश नक्की करा. यातील ब्रोमिलीन प्रोटीन पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे.
पालक : जिममध्ये जाणाऱ्या पुरुषांनी आहारात पालकाचा समावेश करावा. शाकाहारीसांठी पालक अतिशय फायदेशीर आहे.
बदाम : सुक्या मेव्यात बदामाला अधिक महत्त्व आहे. ताकद व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाल्ले जाते. फळे,
सुकामेवा : मोसमानुसार फळांचे सेवन करा. आहारात अधिक प्रमाणात फळे खा. तसेच सुक्यामेव्याचेही सेवन करा. यात फॅटचे प्रमाण योग्य असते त्यामुळे ते शरीरासाठी हानिकारक नसते. त्यामुळे जिम जाणाऱ्यांनी अक्रोड, बदाम, काजू खावेत.














































































