Last Updated on 03 Mar 2025 7:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जय हनुमान पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक
सांगली : जागतिक घडामोडीने पेट्रोल,डिझेलच्या किंमती वाढून देशात सर्वच वस्तूंच्या किंमती वाढू शकतात. दिवसेंदिवस रुपयाचे अव मूल्यन होत असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थे वर दुरगामी परिणाम होत आहेत. त्यामुळे देशातील बॅंका आणि पतसंस्थांना सावध व्हायला हवे, असे आवाहन माजी अर्थमंत्री आ.जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील समारंभात बोलताना केले. जय हनुमान पत संस्थेने विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
इस्लामपूर येथील जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या मार्केट यार्ड शाखेच्या स्थलांतर इमारतीच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. राजारामबापू पाटील सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, जय हनुमान पतसंस्थेचे कुटुंब प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, माजी नगराध्यक्ष अँड. चिमणभाऊ डांगे, पै.भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, मुनीर पटवेकर, सुभाष सूर्यवंशी, सौ.अरुणादेवी पाटील, माजी सभापती खंडेराव जाधव, युवा नेते संदीप पाटील, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शहा, उपाध्यक्ष अनिल जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील ,माजी नगराध्यक्ष स्व.विजयभाऊ पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले,आपल्या देशात ६० रुपयांचा १ अमेरिकन डॉलर ८७ रुपयांवर गेला आहे. दिवसेंदिवस रुपयाची कमी होणारी किंमत हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या देशाच्या २१० लाख कोटीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी महसूल वाढविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यातून देशात काही नवे प्रश्न निर्माण होऊ शकतात. जय हनुमान पतसंस्थेने राजकारण विरहीत कारभार करीत चांगला विस्तार केला असून आपले वेगळेपण सिध्द केले आहे.
शहाजीबापू पाटील म्हणाले,आम्ही लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नावाने गणेशोत्सव मंडळ सुरू केल्यानंतर पतसंस्था सुरू करण्याची कल्पना पुढे आली. एका छोट्या खोलीत सुरू केलेल्या आमच्या पतसंस्थेने आ.जयंतराव पाटील यांच्या आशिर्वादाने ९१ कोटीपर्यंतचा टप्पा गाठला आहे. आमच्या तिन्ही शाखांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देताना शहराच्या विकासाला हातभार लावला आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अँड.चिमण भाऊ डांगे,पै.भगवानआबा पाटील,आनंदराव मलगुंडे यांचीही भाषणे झाली.
यावेळी माजी नगराध्यक्षा शकुंतला माळी यांच्यासह माजी नगराध्यक्षांचा,तसेच स्पर्धा परीक्षेतून महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या प्रियांका महादेव जाधव,जागा मालक सज्जन साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्यूआर कोड प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, संजय पाटील, पुष्पलता खरात, शंकरराव पाटील, शंकरराव चव्हाण, धैर्यशिल पाटील (बोरगाव), उद्योजक बाबुराव हुबाले, अशोक उरूणकर, माजी नगरसेविका शुभांगी शेळके, कोमल बनसोडे, आदिनाथ चौधरी, मालन वाकळे, शाखा अध्यक्ष राजेंद्र शहा, सचिव विक्रांत कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी संचालक सुनिल वैद्य यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रणजित गायकवाड यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्र संचालन केले.










































































