Last Updated on 16 Jul 2020 5:17 PM by
ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशी आहेत.प्रत्येक माणूस विशिष्ट राशीत जन्माला आलेला असतो.त्यावरून त्याची स्वभाववैशिष्ट्य ठरतात.माणसाच्या आयुष्यात राशीचं बरंच महत्त्व असतं.राशींनुसार ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही उपाय सांगितले जातात.त्यापैकी एक उपाय म्हणजे मंत्रपठण.प्रत्येक राशीचा लाभदायी मंत्र असतोे.या मंत्राच्या पठणाने आयुष्यातल्या अडचणी दूर होऊ शकतात.रावणानेही मंत्रांच्या पठणाने शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. प्रत्येक राशीच्या मंत्रांविषयी जाणून घेऊ या.
- मेष राशीचे लोक ऊं र्हीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नम: या मंत्राचा जप करू शकतात. विशेषत: गुरूवारी हा मंत्र म्हणावा. अडचणी कमी होऊ शकतात.
- वृषभ राशीच्या लोकांनी ऊं गोपालायै उत्तर ध्वजाय नम: हा मंत्र म्हणावा. यामुळे नात्यांमधला दुरावा कमी होतो.
- मिथुन राशीच्या लोकांनी ऊं क्लीं कृष्णायै नम: या मंत्राचा जप करावा. यामुळे विवाहाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात.
- कर्क रास असणायांनी ऊं हिरण्यगर्भायै अव्यक्त रूपिणे नम: हा मंत्र म्हणावा.
- सिंह रास असणार्यांनी दर गुरूवारी ऊं क्लीं ब्रह्मणे जगदाधारायै नम: हा मंत्र म्हटल्यास आरोग्यविषयक तक्रारी दूर होऊ शकतात.
- कन्या राशीचे लोक मंगळवारी ऊं नमो प्रीं पीताम्बरायै नम: हा मंत्र म्हणू शकतात.
- ऊं तत्त्व निरंजनाय तारक रामायै नम: हा मंत्र तूळ राशीच्या लोकांनी म्हणावा.
- ऊं नारायणाय सूरसिंहायै नम: हा मंत्र वृश्चिक राशीच्या लोकांनी म्हणावा.
- ऊं श्री देवकीकृष्णाय ऊ र्ध्वषंतायै नम: हा मंत्र धनु राशीच्या लोकांना लाभदायी ठरतो.
- ऊं श्री वत्सलायै नम: या मंत्राचा उच्चार मकर राशीच्या लोकांनी करावा.
- कुंभेच्या लोकांनी श्रीं उपेंद्रायै अच्युताय नम: हा मंत्र म्हणावा.
- ऊं क्लीं उद्धताय उद्धारिणे नम: हा मंत्र मीन राशीच्या लोकांनी म्हणावा.














































































