Last Updated on 05 Aug 2020 7:15 AM by
सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मुख्य पूजेला सुरुवात
मंत्रोचरणेस केली सुरुवात, भक्तीमय वातावरणात गजबजली अयोध्या
जे बोलले तेच करून दाखवले : राम मंदिराचा पाया घालून 29 वर्षानंतर पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहचले
लखनऊ : अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा अवघ्या काही मिनिटांवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होईल. त्याआधी राम जन्मभूमी परिसरात नरेंद्र मोदींनी पारिजातकाचे वृक्षारोपण केले.राममंदिराचा भूमिपूजन सोहळा सुरु, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मुख्य पूजेला सुरुवात, पंतप्रधानांसह काहीच लोकांची उपस्थिती आहे.

तत्पूर्वी,पंतप्रधानांनी हनुमानगढीत चांदीचा मुकुट अर्पण केला. एक प्रदक्षणा पूर्ण केली. त्यांनी साष्टांग दंडवत घालत दर्शन घेतले.हनुमानगढ़ी येथे पंतप्रधानांना चांदीचा मुकुट आणि हनुमान गदा भेट दिली.अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह केवळ 5 जणांना स्थान देण्यात आलं आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश आहे.
राममंदिराचा भूमिपूजन सोहळा अवघ्या काही क्षणात सुरु होणार, पायाभरणीसाठी पाया खोदण्यासाठी चांदीचं फावडं, तर चांदीची वीट
12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाचा मुहूर्त अतिशय शुभ, मोदी याच वेळात भूमिपूजन करणार
राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकाराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात झाली.













































































