Last Updated on 06 Oct 2021 7:16 AM by Sanjay Patil/Adhorekhit
अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मुंबईत निधन;गेली ४० वर्ष अरविंद यांनी गुजराती सिनेसृष्टीत मोलाचे योगदान
मुंबई :
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’ या लोकप्रिय पौराणिक मालिकेत रावणाची प्रमुख भुमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती.मंगळवारी रात्री उशिरा त्यांना ह्यदयविकाराचा इटका आला. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र त्यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले आणि मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
अरविंद त्रिवेदी यांची रामायण मालिकेतील रावणाची भूमिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिल. त्यांचा भारदस्त अभिनय, त्यांची अभिनय करण्याची पद्धत, त्याचा जबरदस्त आवाज, त्याचा पेहराव या सगळ्या गोष्टींनी त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. रावणाची नकारात्मक भूमिका असूनही अरविंद यांच्यावर प्रेक्षकांची प्रचंड प्रेम केले. आजही रावणाची भूमिका म्हटल्यास अरविंद यांचे नाव समोर येते. त्यांच्या इतकी रावणाची उत्तम भूमिका आजवर कोणीही वठवलीले नाही. अनेकांनी तसा प्रयत्न केला मात्र अरविंद यांच्यासमोर सारेच फिके पडले.
अरविंद त्रिवेदी यांनी हिंदी तसेच गुजराती सिनेमातही काम केले आहे. गुजराती सिनेसृष्टीत अरविंद यांची मोठी कारकिर्द पहायला मिळते. मात्र रामायण मालिकेत त्यांनी साकारलेल्या रावणाच्या भूमिकेमुळे ते लोकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरले होते. त्यानंतर विक्रम आणि वेताळ ही मालिका देखील चांगलीच गाजली होती. गेली ४० वर्ष अरविंद यांनी गुजराती सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. हिंदी तसेच गुजराती मिळून आतापर्यंत अरविंद यांनी ३०० हून अधिक सिनेमात काम केले आहे.ते 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले आणि पाच वर्षे पदावर राहिले होते.









































































