Last Updated on 29 Oct 2021 5:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत आहे.त्यामुळे नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे.हवामान खात्याने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे.
यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासह देशात बहुतांशी ठिकाणी पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे.दरम्यान दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे.मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे.पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत आहे.त्यामुळे नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे.
दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात 1-2 नोव्हेंबर रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सोमवार, 1 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला असून याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, सोलापूर आणि पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
मंगळवार, 2 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच पुणे, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
येत्या 4-10 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ते जास्त तीव्र न होता पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी दक्षिण भारतात पाऊस सक्रीय होईल. तर राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. दरम्यान, यंदा राज्याला पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होवून जनजीवन विस्कळीत झाले














































































