Last Updated on 24 Jun 2023 5:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यात पोलिस निरीक्षकांच्या बदल्यानंतर आता गृह विभागाने शुक्रवारी राज्यातील 639 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
राज्यातील अपर जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी,तहसीलदारांच्या बदल्या झाल्या.त्याचबरोबर पोलीस दलातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या.पोलीस उपाधीक्षक,सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या नुकत्याच झाल्या.पण,पोलीस दलातील ठाणेदारांसह सहाय्यक निरीक्षक,उपनिरीक्षक आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या गेली तीन-चार महिने झाले मुहूर्ताच्या प्रतीक्षेत होत्या.पण,नुकत्याच पोलिस निरीक्षकांच्या बदल्या बदल्या झाल्या.आणि आता शुक्रवारी राज्यातील 639 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत.यामध्ये विहित कालावधी पूर्ण झालेल्या 540 तर विहित कालावधी पूर्ण न झालेल्या 99 सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.तसेच यातील काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळालेली आहे.न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे, व त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा असे आदेशात म्हटले आहे.
विहित कालावधी पूर्ण बदली आदेश PDF मध्ये असा
या link क्लिक करा
👇👇👇👇
विहित कालावधी पूर्ण बदली आदेश PDF मध्ये असा
या link क्लिक करा
👇👇👇👇











































































