Last Updated on 31 Jan 2025 9:11 AM by Sanjay Patil/Adhorekhit
ऊस विकास समितीच्या अध्यक्षपदी अमरसिंह साळुंखे
इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून ऊस विकास समिती,तसेच उपपदार्थ व अभिनव उपक्रम समितीची स्थापना केली आहे. ऊस विकास समितीच्या अध्यक्षपदी अमरसिंह शिवाजीराव साळुंखे (करंजवडे), तर उपपदार्थ व अभिनव उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी अतुल सुधाकर पाटील (पेठ) यांची निवड केली आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,माल खरेदी समितीचे अध्यक्ष व माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील यांच्या हस्ते दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
लोकनेते राजारामबापू पाटील यांचे विचार व माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा साखर कारखाना राज्यात व देशात यशस्वी वाटचाल करीत आहे. त्यास अधिक गतिमान करण्यासाठी या दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ऊस विकास समिती च्या माध्यमातून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी उत्पादन वाढीस अद्यावत मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जाणार आहे. ठिबक सिंचन,सच्छिद्र निचरा प्रणाली योजना अधिक गतिमान करून सेंद्रीय व गांडूळ खत,शुध्द बियाणे शेतकऱ्यां ना उपलब्ध करून दिले जाणार आहे. उपपदार्थ व अभिनव उपक्रम समितीच्या माध्यमातून अर्क शाळा,सहविज निर्मिती, इथेनॉल निर्मिती,सौर ऊर्जा,कॉम्प्रेसड बायोगॅस आदी उपपदार्थ विस्तारवाढ व नाविन्यपूर्ण उपपदार्थ निर्मिती उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
हेही वाचा – राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख शुध्द ऊसाची रोपे उपलब्ध करून देणार
याप्रसंगी शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर.डी. माहुली, सचिव डी.एम.पाटील, तसेच एस.डी. कोरडे, विजय मोरे, सुनिल सावंत,प्रशांत पाटील, प्रेमनाथ कमलाकर, उमेश सुतार, धैर्यशिल पाटील, संतोष खटावकर,आर.एस. पाटील, सुनिलकुमार जाधव, भूपाल पवार आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.














































































