Last Updated on 09 Apr 2025 6:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू इनडोअर स्टेडियमचे खेळाडू कु.समर्थ श्रीकांत सावंत याने डेरवण चिपळूण येथील राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात कांस्य पदक,तर कु. ईशान संजय घेरडे याने १३ वर्षाखालील गटात सुवर्ण पदक पटकाविले आहे. माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी दोन्ही यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशिक्षक सचिन भिलारे प्रामुख्याने उपस्थित होते.
कु.समर्थ सावंत हा गेल्या ५ वर्षापासून राजारामबापू इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटनचा सराव करीत आहे. त्याने सांगली येथील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत १३ वर्षाखालील गटात व १५ वर्षाखालील गटात सुवर्ण पदक पटकाविले आहे. गेल्या वर्षीही त्याने डेरवण येथील राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले आहे. दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक सचिन भिलारे प्रशिक्षण मिळत आहे. ईशान घेरडे यानेही जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविलेले आहे.
राजारामबापू साखर कारखान्याचे कर्मचारी श्रीकांत सावंत,कासेगाव शिक्षण संस्थेच्या ताकारी येथील डी.आर.पाटील विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक संजय घेरडे यांचे दोन्ही खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आहे.














































































