Last Updated on 19 Oct 2021 2:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
देशात नवरात्र उत्सव सुरु आहे. भारतात अनेक रहस्यमयी, अनोखी आणि चमत्कारी मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरांचे रहस्य आजही रहस्यच आहे. झारखंड राज्यातील गुमान जिल्यात हपामुनी नावाच्या गावात असलेले महामाया मंदिर हे त्यातील एक.गुमला जिल्हा मुख्यालयापासून 26 किमी अंतरावर असलेल्या घाघरा ब्लॉकच्या हापामुनी गावात हे मंदिर 1100 वर्षांपूर्वी विक्रम संवत 965 मध्ये बांधण्यात आले.या मंदिरातील मूळ मूर्ती आजही पेटीत बंद आहे. बाहेर या देवीची प्रतिमा आहे. अमावस्येला येथे डोलजत्रा असते. त्यावेळी ही पेटी डोल चबुतऱ्यावर आणली जाते आणि मुख्य पुजारी ही पेटी उघडून मातेची पूजा करतो. ही पूजा डोळे बांधून केली जाते. कारण ही मूर्ती नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाही असे सांगितले जाते.
चैत्र कृष्ण पक्ष परवेला (अमावस्या) डोल जत्रेचा उत्सव होतो. या दिवशी मंजूषा (पेटी) डोल प्लॅटफॉर्मवर बाहेर काढली जाते आणि मंदिराचे मुख्य पुजारी पेटी उघडून महामायाची पूजा करतात. डोळ्यांवर पट्टी बांधून पुजारी आईची पूजा करतात. या मंदिराशी संबंधित कथा जाणून घेऊया …
या मूर्तीचे प्रतिक म्हणून दुसरी मूर्ती मंदिरात स्थापन केली गेली आहे. या मंदिराविषयी अनेक कथा आहेत. स्थानिक सांगतात, बरजूराम नावाचा एक पुजारी मंदिरात पूजा करत असताना काही बाहेरच्या लोकांनी हल्ला चढवला आणि त्याच्या पत्नी, मुलांना ठार मारले. बरजूला जेव्हा हे समजले तेव्हा महामाया प्रकट झाली आणि तिने तू एकटा हल्लेखोरांशी लढू शकतोस फक्त मागे वळून पाहू नको अन्यथा तुझे मस्तक धडावेगळे होईल असे सांगितले.

बरजू लढला पण विजय होतोय असे पाहताच त्याने मागे वळून पहिले आणि त्याचे मस्तक धडावेगळे झाले. जेथे त्याचा मृत्यू झाला तेथे त्यांची समाधी आहे. या मंदिरात अनेक देवी देवताच्या मूर्ती आहेत. ११०० वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे असे सांगतात. त्या काळात एक मुनी येथे आले होते. ते अतिशय कमी बोलत म्हणून त्यांना हप्पा मुनी असे म्हटले जात होते. हप्पा म्हणजे गप्प बसणे. त्यांच्यावरून या गावाचे नाव हप्पामुनी पडले, त्याचे आता हपामुनी झाले आहे. येथे भूताखेतांचा वावर असतो असाही समज आहे.
तांत्रिक पीठ मंदिर

भुत खेतामुळे येथे तांत्रिक पूजा सुरु झाली होती. त्यावेळी गुन्हे करणाऱ्याला या मंदिरात येऊन शपथ घेण्यास सांगितले जात असे. ज्याने गुन्हा केला असेल तो मंदिरात जाण्यापूर्वीच भीतीने गुन्हा कबुल करत असे. त्यावेळी या प्रकाराला मान्यता होती आता ही प्रथा मागे पडली आहे.
असे म्हणतात की विक्रम संवत 959 मध्ये हिरे आणि मोत्यांच्या शोधात गेलेल्या हजारो लोकांचा बुडून मृत्यू झाला. ही बातमी पसरली की जे लोक बुडून मरण पावले ते आपापल्या गावात भूत म्हणून फिरत आहेत. हपामुनींच्या सूचनेनुसार नागवंशी राजा माता भगवतीला आणण्यासाठी विंध्यचल येथे गेला. राजाने विंध्याचलमध्ये 3 वर्षे आई भगवतीची तपश्चर्या केली. तपश्चर्येनंतर राजा मा भगवतीच्या पूर्वेकडे पायी येत होता. या दरम्यान त्याने देवी भगवतीला टंगीनाथधाममध्ये जमिनीवर बसवले आणि आई जमिनीत लीन झाली. मुनीने आईची स्तुती केली त्यानंतर आई भगवती मुरलीधरसोबत बाहेर आल्या. राजा भगवतीसह गावात आला, ज्यामुळे गावातून भुतांचा नंगा नाच संपला. यानंतर मंदिरात मा भगवतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.









































































