Last Updated on 13 Sep 2025 6:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । फार्णेवाडी (ता. वाळवा) येथील संदीप ईश्वरा फार्णे यांची रयत क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आमदार सदाभाऊ खोत व युवा नेते सागर खोत यांच्या हस्ते त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले .
गेले तीस पस्तीसवर्षे झाले संदीप फार्णे माझ्याबरोबर चळवळीत निष्ठेने काम करीत आहे त्याची पोच पावती म्हणून जिल्हा उपाध्यक्ष पदाची त्यांना आम्ही संधी देत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराला आदर्श मानून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, वाहतूकदार व इतर समाज घटकाच्या हक्कासाठी सन्मानासाठी काम करीत आहे. त्याच विचारांसाठी माझ्या पदाचा मी उपयोग करीन व काम करीत राहीन असे संदीप फार्णे यांनी असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले, ज्येष्ठ नेते सुनील सावंत, जयवंत पाटील, अध्यक्ष सुदर्शन पाटील, महेश माने, रोहण बाबर व पदाधिकारी उपस्थित होते.






































































