Last Updated on 25 Sep 2021 2:12 AM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्राचे घवघवीत यश! 100 हून अधिक विद्यार्थी उतीर्ण

नवी दिल्ली : यूपीएससीने नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. एकूण 761 उमेदवारांना या निकालामधून नियुक्ती देण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये शुभम कुमार या परीक्षेत अव्वल आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.

![]()
नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला आहेत. आयएएस अधिकारी आणि 2015 बॅचची टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिया डाबीने 15 वी रँक मिळवली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
निकालानुसार, टॉप 25 उमेदवारांमध्ये 13 मुले आणि 12 मुलींचा समावेश आहे. शिफारस केलेल्या उमेदवारांमध्ये 25 व्यक्ती अपंगत्व असलेल्या (07 ऑर्थोपेडिकली अपंग, 04 दृष्टिहीन आव्हान, 10 श्रवणदोष आणि 04 अनेक अपंग) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून विनायक कारभारी याला ३७ वा रँक मिळाला आहे.आयोगातर्फे 180 आयएएस, 36 आयएफस, 200 आयपीएस, सेंट्रल सर्व्हिस ग्रप ए 302, ग्रुप बी सर्व्हिस 118 अशा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 836 नुयक्त्या केल्या जाणार आहेत.
यूपीएससी दरवर्षी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेते ज्यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असतो. या परीक्षांच्या माध्यमातून, उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) यासह इतर विविध सेवांसाठी निवड केली जाते. जानेवारी २०२१ मध्ये लेखी आणि सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मुलाखती झाल्या होत्या. यातून यामध्ये खुल्या प्रवर्गातून २६३ तर आर्थिक मागास प्रवर्गातून ८६, अन्य मागास प्रवर्गातून २२९ तर अनुसूचित जाती १२२, अनुसूचित जमाती ६१ उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
महाराष्ट्राचे घवघवीत यश! 100 हून अधिक विद्यार्थी उतीर्ण
या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये मृणाली जोशी (36), विनायक कारभारी नरवाडे (37), रजत रविंद्र उभयकर(49), जयंत नाहाटा (56), विनायक महामुनी (95) यांचा समावेश आहे.
राज्यातील इतर यशस्वी विद्यार्थी
लक्ष्य कुमार चौधरी (132), शुभम कुमार खंडेलवाल (133), रीचा कुलकर्णी (134), कमलकीशोर देशभुष खंडारकर (137), अवध सोमनाथ निवृत्त (166), अभिषेक खंडेलवाल (167), गौरव रविंद्र सांळुके, पार्थ कश्यप (174), प्रतिक अशोक धुमाळ (183), आशिष गंगवार(188), रीना प्रधान (194), नितीशा संजय जगताप (199), संचित गंगवार (222), तुषार उत्तम देसाई (224), प्रथमेश अरविंद राजेशिर्के (237), साहील खरे (243), संकेत बलवंत वाघे (266), मयुर खंडेलवाल (284) प्रवीण दराडे (312) , आकाश चौधरी (322), आनंद पाटील (325), सचिन चौबे (334), श्रीकांत विसपुते (335), साहिल संगवान (336), दिव्या गुंडे (338), सुहास गाडे (350), सागर मिसाळ (353), सुरज गुंजाळ (554), अनिल म्हस्के (361), अर्पिता ठुबे (383), सागर वाडी (385), आदित्य जिवने (399), अमोल मुरकुट (402) गोगणा गावित (422), अनिकेत फडतरे (426), श्रीराज वाणी (430), राकेश आकोलकर (432), वैभव बांगर (442), शुभम जाधव (445), अमर राऊत (449), शुभम नागरगोजे (453), ओंकार पवार (455), अभिषेक दुधाळ (469), प्रणव ठाकरे (476), श्रीकांत मोडक (499), यशवंत मुंडे (502), अनुजा मुसळे (511), बानकेश पवार (516), अनिकेत कुलकर्णी (517), अश्विन राठोड (520), अर्जित महाजन (521), शुभम स्वामी (523), श्रीकांत कुलकर्णी (525), शरण कांबळे (542), स्नेहल ढोके (564), सचिन लांडे (566), स्वप्निल चौधरी (572), अभिषेक गोस्वामी (574), अनिल कोटे (584), विकास पालवे (587), विशाल सारस्वत (592), मोहम्मद शाहिद खान (597) हर्षल घोगरे (614), अजिंक्य विद्यागर (617), निलेश गायकवाड (629), हेताळ पगारे (630), रविराज वडक (633), कुणाल श्रोते (640), सायली गायकवाड (641), सुलेखा जगरवार (646) ,सुबोध मानकर (648) ,शिवहार मोरे (649) ,सुब्रह्मण्य केळकर (653) , सुमितकुमार धोत्रे (660), किरण चव्हाण (680), सुदर्शन सोनवणे (691), विनीत बनसोड (692), श्लोक वाईकर (699), अजय डोके (705), देवव्रत मेश्राम (713), स्वप्निल निसर्गन (714), शुभम भैसारे (727), पियुष मडके (732), शितल भगत (743), स्वरूप दीक्षित (749).
औरंगाबादचा शुभम नागरगोजे ऑल इंडिया रँक ४५३
महाराष्ट्रातील लातूरची असलेल्या नितिशाने पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे. लातूर येथील निलेश गायकवाड यूपीएससीमध्ये देशात 629 रँकने उत्तीर्ण झाला आहे. गेल्या वर्षी ही निलेशने यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यावेळी 752 रँक आली होती. तो सध्या संरक्षण सहाय्यक नियंत्रकपदी नियुक्तही झाला होता. सध्या त्याची पुण्यात त्याचं प्रशिक्षण सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शुभम पांडुरंग जाधव याने 445 रँक मिळवणून यश मिळवलं आहे.
रँक 137- कमलकिशोर कांदरकर (लातूर)
रँक 138- दर्शन दुगड (यवतमाळ)
रँक 501- अभिजीत वेकोस (जालना-लातूर)
महाराष्ट्रातून मृणाली अविनाश जोशी ही गुणवत्ता यादीत 36 व्या क्रमांकावर तर विनायक कारभारी नरवडे हा 37 व्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे विनायक महामुनी, वलय वैद्य, ऋचा कुलकर्णी, कामलकिशोर कंदरकर, नवमी साटम, प्रतिक जुईकर, नितिशा संजय जगताप, साहिल खरे, संकेत वाघे, परमानंद दराडे, आनंद पाटील, सुहास गाडे, पार्थ जगदीश कश्यप यांनीही गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं आहे.
पुण्यातील पार्थ कश्यप 174 वा क्रमांकावर
पार्थ जगदीश कश्यप युपीएससीची मुख्य परीक्षा पहिल्या प्रयत्नांत यशस्वी झाला. देशपातळीवर त्याचा १७४ वा क्रमांक आहे. त्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेत प्रथम वर्ग अधिकारी म्हणून त्याची निवड होऊ शकते. तो स्व-रूपवर्धिनीचा विद्यार्थी आहे. पार्थने मंगळवार पेठेतील वर्धिनीच्या रामकृष्ण शाखेचा प्रमुख म्हणून अतिशय उत्तम काम केले आहे.
खुल्या प्रवर्गातून 263 उमेदवार उत्तीर्ण
नागरी लोकसेवा आयोग 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
यूपीएससीने जारी केलेल्या सुचनेनुसार सिव्हिल सेवा परीक्षा (मुख्य) जानेवारी 2021 मध्ये घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये पूर्ण झाली आहे. ज्या उमेदवारांची नावे मुलाखतीनंतर निवड यादीत आली आहेत त्यांचे रोल नंबर UPSC च्या वेबसाइट https://www.upsc.gov.in/ वर जाऊन पाहता येऊ शकतील. उमेदवार येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट त्यांचा निकाल देखील पाहू शकतात.
यूपीएससी नागरी सेवा निकाल 2021 असा करा चेक
1. upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. आता तुमच्या स्क्रीनवर एक PDF दिसेल.
4. त्यात तुमचा रोल नंबर आणि नाव शोधा.
5. जर तुमचा रोल नंबर आणि नाव त्यात असेल तर तुम्ही उत्तीर्ण आहात.
6. तुम्ही डाउनलोड बटणावर क्लिक करून ही पीडीएफ सेव्ह करू शकता.














































































