Last Updated on 20 Sep 2021 3:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
या पृथ्वीतलावर अशा अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी ठासून भरलेल्या आहेत.ज्यावर आपण विश्वासही ठेऊ शकत नाही पण त्या खऱ्या असतात.या जगामध्ये असाही एक देश आहे की जिथे रात्र ही फक्त ४० मिनिटांची असते.ज्याला मध्यरात्री चमकणारा देश असे म्हटले जाते आणि तो देश म्हणजे नॉर्वे. ऐकायला थोडे विचित्र वाटते पण हे खरे आहे.
नॉर्वे हा एक उत्तर युरोपीय देश आहे. इथे फक्त ४० मिनिटांचीच रात्र असते. नॉर्वेमधील हेमरफेस्ट शहरात फक्त ४० मिनिटांचीच रात्र असते. येथे रात्री १२ वाजून ४३ मिनिटांनी सुर्य मावळतो आणि फक्त ४० मिनिटांनंतर उगवतो. असे फक्त वर्षाच्या मे आणि जुलैच्या काळात घडते. यामुळे नॉर्वेला इंट्री ऑफ मिडनाइट सन म्हटले जाते.
यामागचे नेमके कारण काय ?
२१ जून आणि २२ डिसेंबर या अशा तारखा आहेत ज्या दिवशी सूर्यांचा प्रकाश धरतीच्या समान भागांमध्ये पसरत नाही.कारण पृथ्वी ६६ अंश बनवून फिरते. यामुळे दिवस आणि रात्रीच्या वेळेमध्ये फरक येतो.नॉर्वेमध्ये ४० मिनिटांची रात्री २१ जूनच्या स्थितीमुळे होते.यावेळी ६६ अंश उत्तरी अक्षांश ते ९० अंश उत्तरी अक्षांशपर्यंत पृथ्वीचा पूर्ण भाग सूर्य प्रकाशामध्ये राहतो.यामुळे सूर्य फक्त ४० मिनिटांसाठी मावळतो.














































































