Last Updated on 24 Sep 2021 6:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हायलाइट्स:
-
मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
-
येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीयांची मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडणार
-
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे- मुख्यमंत्र्यांचे आवाहन
![]()
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे.घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज्यात टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले होते.त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडणार असली तरी भाविकांना कोरोना विषयक नियम पाळावे लागणार आहेत.
कोरोना संसर्गाची पहिली लाट नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली केली होती. मात्र, दुसरी लाट सुरू झाल्यानंतर प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. मध्यंतरी विरोधी पक्ष भाजपने मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मंदिर भाविकांसाठी खुली करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी सरकारने मंदिरांबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता.
आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावल्याने सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भक्तांना मंदिरात जाऊन देवदर्शन घेता येणार आहे. मंदिराप्रमाणे अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळेही नवरात्रीपासून खुली होतील.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे कळकळीचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे कळकळीचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.











































































