Last Updated on 31 Dec 2021 5:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे मिरज वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या प्रकरणची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना दिल्या.

मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी आणि काही शिकाऊ डॉक्टर मिळून 82 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोना संसर्ग झालेल्या सर्वच रुग्णांचे स्वॅब ओमायक्रॉन तपासणीसाठी पुणे आणि दिल्लीतील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान,या प्रकरणची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना देशमुख यांनी दिल्या आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच यास जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.









































































