Last Updated on 07 Nov 2021 9:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
असे असेल या महिन्याचे राशी भविष्य
![]()
मेष
उत्तरार्धात यशप्राप्तीचे योग !
दशमातील गुरु पोर्णिमेपर्यंत संमिश्र प्रकारची फळे दर्शवितो.कामासाठी धावपळ होईल.शाररिक थकवा जाणवेल.गुप्त शत्रु डोके वर काढतील.कौटुंबिक कलह निर्माण होतील.उत्तरार्थात लाभस्थानातील गुरु व शुक्र व यशप्राप्तीसाठी कारणीभुत ठरेल.आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होईल.अनुकूल वातावरण निर्मिती होईल.
![]()
वृषभ
जुन्या व्याधी त्रास देतील!
भागीदारीत वितुष्ठ येईल,कायदेशिर बाबतीत अपयश येईल.काहीवेळा अतिआत्मविश्वासच नुकसानीस कारणीभुत ठरेल असा अनुभव येईल.मानसिक त्रासामुळे जुन्या व्याधी डोके वर काढतील,नोकरीचे व आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होईल.
![]()
मिथुन
परदेशगमनाचे योग येतील !
परदेशगमनाचे योग येतील ! पूर्वार्ध कटकटी-मानसिक आर्थिक त्रासातून गेला तरी पोर्णिमेनंतर उत्तरार्धात परदेशगमन व व्यापारात चांगल्या संधी चालून येतील.मनोधैर्य वाढेल,विवाह इच्छुकांचे विवाह जुळुन येतील.प्रगतीच्या दृष्टीने हा कालखंड चांगला जाईल प्रवास घडतील.
![]()
कर्क
भावनिक वादळे निर्माण होतील!
भावनिक वादळे निर्माण होतील! व्यावसायिक हितशत्रूचा त्रास जाणवेल,शारिरीक व्याधीमुळे त्रस्त व्हाल.भावनिक वादळे निर्माण होती. त्यात न अडकता संयमाने मार्गक्रमण करणे हिताचे ठरेल.माता-पिता संतती यांच्या प्रकृत्तीची चिंता निर्माण होईल.नोकरीत बदलीचे योग त्रासदायक ठरतील.
![]()
सिंह
नावलौकिक प्राप्त होईल
उत्तरार्धात विवाहइच्छुकाचे विवाह जुळून येतील,पुर्वात सर्व बाबतीत यशप्राप्तीचे योग येतील, उद्योगधंदयात नवनविन योजना हाती घ्याल, त्या पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न कराल.नावलौकिक वाढेल.
![]()
कन्या
आय व व्यय समसमान राहील !
आय व व्यय समसमान राहील, त्यादृष्टीने महत्त्वाचे व कमी महत्त्वाचे असा प्राधान्यक्रम ठरवून वाटचाल करणे हिताचे ठरेल.आपला स्पष्टवक्तापणा समोरच्याला त्रासदायक वाटेल,त्यासाठी वादाचे विषय टाळावेत.वाहनसौख्य वास्तु योग संभवतो.
![]()
तूळ
भागीदारीत वाद निर्माण होतील
शारिरीक प्रकृत्तीची तक्रार जाणवेल.विशेषत: उष्ठातेचे विकार निर्माण होतील.भागीदारीच्या व्यवसायात वादाचे प्रसंग उद्भवतील,वैवाहिक जोडीदार निवडताना काळजी घ्यावी.उत्तरार्थात प्रकृतीची चिंता दूर होऊन सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.
![]()
वृश्चिक
आर्थिक त्रास संभावतात !
औषय पाण्यावरती जास्तीचे खर्च होतील.उद्योग – व्यवसायात कामगारांच्या विरोधी कारवायामुळे मानसिक व आर्थिक त्रास संभवतात. त्यावरती न चिडता संयम व कार्यकुशलतेने व्यव्हारिक तडजोडीने मार्ग काढल्यास अडचणी दूर होतील.
![]()
धनु
मंगल कार्ये घडतील !
उत्तराप्रति कायदेशीर प्रश्न निर्माण होतील,पुर्वार्थात जे कमाविले ते घालविण्याचे प्रसंग उद्भवतील त्यादृष्टीने काळजी घ्यावी.घरात मंगल कार्याची चाहूल लागेल, पूर्वार्धात विवाह जुळून येतील,मित्रांची चांगली मदत होईल. उत्तरार्धात मित्रांकडूनच त्रासदायक परिस्थिती निर्माण होईल.
![]()
मकर
आर्थिक प्राप्तीचे योग!
पूर्वार्धात अपेक्षित नोकरीचे ठिकाण न मिळाल्यामुळे त्रास जाणवणार आहे.त्या उलट उत्तरार्धात त्याच ठिकाणी जुळवून घेतल्यामुळे चांगल्या प्रकारे रुळाल ! शत्रु कारवाया थांबतील,ताण-तणाव कमी येईल.आर्थिक प्राप्तीचे योग येतील.
![]()
कुंभ
नोकरी – व्यवसायात अपेक्षित बदल !
गुरु- शनिची व्ययातील युती उत्तरार्धात संपुष्टात येवून लग्नी गुरुमुळे पाठीमागील काळात झालेला त्रास काही अंशी कमी होण्यास मदत होईल.नोकरी व्यवसायात अपेक्षित घडून येतील.अर्थकारण सुधारण्यास मदत होईल.विवाह जुळून येतील. विद्यार्थीवर्गाला अनुकुल वातावरण निर्माण होईल.
![]()
मीन
कामासाठी प्रवास व दगदग होईल!
नोकरी-व्यवसाय – विद्यार्थी तसेच विवाह इच्छुकांसाठी पुर्वार्धात अनुकुल काळ आहे. उत्तरार्धात गुरुचे भ्रमण व्ययातून होत असल्यामुळे कामे रेंगाळतील,कामासाठी प्रवास व दगदग होईल.कामात लक्ष न लागल्यामुळे आर्थिक नुकसान होईल त्यादृष्टीने जोखमीची कामे लक्षपूर्वक करणे हिताचे ठरेल.
![]()
अधिक बडवे
ज्योतिष प्रविण,ज्योतिष प्राज्ज्ञ
भ्रमणध्वनी : 9850818193
![]()











































































