Last Updated on 13 Jun 2020 4:12 AM by
असे असेल या महिन्याचे राशी भविष्य
मेष
कौटुंबिक सौख्य लाभेल
नोकरदारांसाठी हा महिना अनुकूल राहील.व्यापारी वर्गांना व्यवसायासाठी अनेक बदल करावे लागतील.नव्या ओळखीचा फायदा होईल.शक्यतो प्रवास टाळावेत.21 जूनच्या सुर्यग्रहणानंतर सर्वच बाबतींत सकारात्मक बदल घडून येतील.कौटुंबीक सौख्य लाभेल.
वृषभ
रागावर नियंत्रण ठेवा
कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. त्यातून त्रास देणारे शत्रूही निर्माण होतील.वाहनसौख्य मिळेल. अतिश्रमाणे तब्येतीवर परिणाम संभवतो, त्या दृष्टीने काळजी घ्यावी. या महिन्यात होणारे सूर्यग्रहण आपल्याला मिश्र स्वरूपाचे परिणाम दिसून येतील. समाजात मान-सन्मान वाढेल. बदलीच्या बाबतीत अपयश येईल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन
प्रवास करणे टाळावे
अनिष्ठ गुरुमुळे नोकरदार वर्ग व व्यापारी या दोन्हींसाठीही त्रासदायक परिस्थिती आहे. सहकारी आयत्यावेळी मदत करण्यास असमर्थता दर्शवतील. अतिमहत्त्वाची कामे लांबणीवर टाकावी लागतील. प्रवास करणे टाळावे. ग्रहणाचे अशुभ परिणाम जाणवतील.

कर्क
सांपत्तिक वाद निर्माण होतील
उत्साहभरात खर्चावर्ती नियंत्रण न राहिल्यामुळे आर्थिक नियोजन ढासाळेल,त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थावरात वाद निर्माण होतील.सुर्यग्रहणाचे अनिष्ठ परिणाम होतील
सिंह
आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल
नोकरीत बढतिचे योग येतील परंतु आपला सहकारीच त्यात खोडा घालण्याचे काम करेल. गेल्या काही महिन्यांपासून ढासळलेली आर्थिक स्थिती पूर्व पदावर येण्याचे संकेत मिळतील. सुर्यग्रहणानंतर तब्येतीची समस्या जाणवेल.कोर्टाची कामे मार्गी लागतील
कन्या
नोकरी,व्यवसाय या सर्वच बाबतीत अनुकूल काळ
कौटुंबिक गरजा वाढल्यामुळे थोड्या फार प्रमाणात आपल्यावरती ताण पडेल. विरोधक गतीविरोधकाचे काम करतील, त्यादृष्टीने पावले टाकतील. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने हा कालखंड उत्तम आहे.सुर्यग्रहण आपल्यासाठी शुभ फळ देणारे आहे.
तूळ
आरोग्याची काळजी घ्या
शेतकरी,नोकरदार व व्यावसायिक या क्षेत्रातील लोकांना संमिश्र स्वरूपाचे फळ मिळेल . मानसिक त्रासामुळे आरोग्यावर परिणाम जाणवेल.औषधपाण्यावर खर्च होईल.सुर्यग्रहण आपल्यास मिश्र स्वरूपाचे फळ देईल.
वृश्चिक
स्थावर मालमत्तेवरून भाऊबंदकीत वाद निर्माण होतील
यावर डोके शांत ठेवून मार्ग काढणे गरजेचे आहे. भागीदारीत काळजीपूर्वक व्यवहार करावेत. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी जुनी येणे वसूल करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. सूर्यग्रहण आपल्याला अशुभ फळ देणारे आहे.

धनु
मान सन्मान वाढेल
नोकरीत अपेक्षित बदल आपल्या पत्यावर पडतील. विवाह इछुकांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. यासाठी प्रवास घडतील. नोकरी.व्यवसाय शेती यासर्व क्षेत्रात आर्थिक लाभ व मान – सन्मानाचे योग्य येतील. सुर्यग्रहणामुळे आपल्याला संमिश्र फळ मिळेल.
मकर
कौटुंबिक आरोग्याची काळजी घ्यावी
उद्योगधंद्यात व्यवहाराच्या मानाने अपेक्षित नफा होणार नाही. नोकरीत आर्थिक लाभऐवजी वरिष्ठांकडून कौतुकावरती समाधान मानावे लागेल. मुलांच्या आरोग्यकडे लक्ष दयावे लागेल.सूर्यग्रहण आपल्याला शुभ फळ देणारे आहे.
कुंभ
आर्थिक स्थिती बिकट राहील
निखराचे प्रयत्न करूनही अपयश पदरी पडल्यामुळे निराश न होता संयम ठेवणे गरजेचे आहे, हेही दिवस जातील असा सकारात्मक विचार करून पुढे जाणे गरजेचे आहे. महत्वाचे आणि कमी महत्त्वाचे असा क्रम ठरवून खर्चावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.कौटुंबिक वादाचे प्रसंग निर्माण होतील.सुर्यग्रहणाचे संमिश्र फळ मिळेल.
मीन
तब्येतीची काळजी घ्या
नवनवीन कल्पनांमुळे उद्योगधंदा टिकवून ठेवण्यात यश मिळेल. शारीरिक व मानसिक श्रमांमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.नोकरीच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. सुर्यग्रहणाचे तब्येतीवर अनिष्ठ परिणाम होतील.
अधिक बडवे
ज्योतिष प्रविण,ज्योतिष प्राज्ज्ञ
भ्रमणध्वनी : 9850818193














































































