Last Updated on 30 Oct 2024 2:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यात विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणताही मतभेद नाही, तसंच मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीत, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं.
मुंबईत काँग्रेस पक्ष कार्यालय टिळक भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी नेते नाना पटोले आणि वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.
भ्रष्टयुतीमुळे राज्याची दुर्गती झाल्याचं सांगत काँग्रेस नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. बेरोजगारी, सरकारी नोकऱ्या, राज्यातील बेपत्ता महिला आणि मुली याविषयी आकडेवारीचा दाखला देत याला महायुती सरकार कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातली विधानसभा निवडणूक महायुती लढवत नसून एकटा भाजप लढवत आहे, असंही रमेश चेन्नीतला यावेळी म्हणाले.










































































