Last Updated on 21 Jul 2025 9:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता 5 वी व 8 वीच्या परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून, ही नोंदणी 31 जुलै 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन मंडळाचे प्रभारी सचिव प्रमोद गोफणे यांनी केले आहे.
वरील नमूद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. 5 वी व इ. 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरील अर्ज भरण्याबाबतच्या आवश्यक सूचना वाचून अर्ज करावा, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव बसवेश्वर किल्लेदार यांनी केले आहे.














































































