Last Updated on 24 Nov 2021 12:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्याचा सरासरी साखर उतारा ८.९३ टक्के इतका
आतापर्यंत १५५.६२ लाख टन उसाचे गाळप
पुणे ।
महाराष्ट्रातील गळीत हंगामाने आता गती घेतली आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २२ नोव्हेंबर २०२१ अखेर राज्यात १५१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.यामध्ये ७४ सहकारी तसेच ७७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.आतापर्यंत १५५.६२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.राज्यात आतापर्यंत १३९.०१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा ८.९३ टक्के इतका आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक ३५ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू झाले आहेत.साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार,२२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सोलापूर विभागात ३४.४९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.तर २८.३५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. येथील साखर उतारा ८.२२ टक्के आहे.
कोल्हापूर विभागात २२ नोव्हेंबरअखेर साखर उतारा १० टक्क्यांवर
महाराष्ट्रातील कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांकडून चांगल्या पद्धतीने उसाचे गाळप सुरू आहे.कोल्हापूरमध्ये सरासरी साकर उतारा १० टक्के आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीनुसार २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत कोल्हापूर विभागात ४२.४४ लाख टन ऊस गाळप झाले आहे. तर ४३.८४ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे.येथील साखर उतारा १० टक्के झाला आहे.
साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत एकूण १५१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.यामध्ये ७४ सहकारी तसेच ७७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.














































































