Last Updated on 17 Apr 2025 8:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, डोंगररांगांनी वेढलेलं आणि भौगोलिक रचनेमुळे देशभरात वेगळं ठरणारं फोफसंडी हे गाव आजही काळाच्या एका वेगळ्याच गतीने चालतं आहे. या गावाचं वैशिष्ट्य काय, तर इथे सूर्य उगवायलाच दोन तास उशीर होतो…आणि मावळायलाही!
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वायव्येला दुर्गम आदिवासी भागातील कोंबडकिल्ला- कुंजीरगडाच्या पायथ्याशी फोफसंडी हे गाव आहे.
अतिदुर्गम गाव असलेल्या फोफसंडीत निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळातो. घाट रास्ता.. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर दऱ्यात लपलेले हे गाव… उंच डोंगरावरून फेसाळत येणारे विविध आकाराचे धबधबे…तर भन्नाट वारा…वाऱ्याच्या वेगाने हवेत उडणारे धबधब्यातील पाणी व मध्येच धुक्याच्या आगमनाने संपूर्ण परिसर आकाशमय… खोल दरीत असलेले ब्रिटिश अधिकारी फोफ यांच्या नावाने परिचित असलेले हे फोफसंडी गाव! येथे सकाळी एक तास उशीरा सूर्य दिसतो. तर सायंकाळी एक तास लवकर डोंगराच्या आड तो लुप्त होतो. भारतात ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य अशा गावात जात असे. तेव्हा पासून या ठिकाणाचे नाव फॉफसंडे असं पडले. पुढे त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी असे झाले.
१२०० लोकसंख्या, बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक इथे राहतात. चार महिने पावसाळ्यात जे शेतीत उगवेल ते कमवून इतर आठ महिने रोजदारीसाठी पुणे व ठाणे जिल्ह्यात येथील नागरिक जातात. या गावी काही घरात गॅस आहे, तर बहुतांशी लोक चुलीवर स्वयंपाक करतात.
गावाच्या आजूबाजूला हिरवळ, धबधबे, नद्या हे सगळं असूनही गावात अजूनही पायाभूत सुविधांची वानवा आहे. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यासाठी नागरिकांना झगडावं लागतं. हे गाव जितकं खास आहे, तितकंच दुर्लक्षितही.
गावाच्या नावामागेही गोष्ट आहे. ब्रिटिश काळात एका अधिकाऱ्याच्या नावावरून फोफसंडी हे नाव पडलं. इथं मांडवी नदीचा उगम आहे आणि ऋषिमुनींची तपश्चर्याही झाली आहे.









































































