Last Updated on 05 Dec 2021 7:04 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कोलकाता ।
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ९० वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत बीसीसीआयने सामनाधिकारी आणि संघाच्या सपोर्ट स्टाफविषयी मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत भारतीय क्रिकेटशी संबंधीत इतरही अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले आणि चर्चा करण्यात आली. बीसीसीआयने सामनाधिकारी आणि सपोर्ट स्टाफच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवली आहे.तर प्रत्येक राज्याच्या बोर्डला १० करोड रुपये मंजूर करण्याला आले आहेत.
सामना अधिकारी आणि सपोर्ट स्टाफसाठी वयोमर्यादा आता 65 वर्षे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सामना अधिकारी आणि सहयोगी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे.आता त्यांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५ वर्षांनी वाढवण्यात आली आहे.सामनाधिकारी आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांची वयोमर्यादा ६० वर्षांवरून ६५ वर्ष केली गेली आहे. पण हे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.
प्रत्येक राज्याच्या बोर्डला १० करोड रुपये मंजूर
बैठकीदरम्यान पुडुचेरी, बिहार आणि उत्तराखंड राज्यांतील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आणि त्यांना आर्थिक मदत देखील करण्यात आली. प्रत्येक राज्याच्या बोर्डला १० करोड रुपये मंजूर करण्याला आले आहेत. तसेच, प्रत्येक ठिकाणी इनडोअर सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाईल.
बीसीसीआयने ब्रिजेश पटेल आणि एमकेजे मजूमदार यांना आयपीएलच्या संचालन परिषदेत नव्याने सामील केले आहे.याबाबत बीसीसीआने माहिती देताना सांगितले की,भारताचा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा आधीपासूनच आयपीएलच्या संचालन समितीत भारतीय क्रिकेटच्या प्रतिनिधीच्या रूपात सहभागी आहे.
बैठकीत या सर्व विषयांव्यतिरिक्त इतरही विषयांवर चर्चा आणि निर्णय घेण्यात आले.याशिवाय बीसीसीआयने दौरा,कार्यक्रम आणि तांत्रिक समिती,पंच समिती आणि अपंग क्रिकेट समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
महिला कसोटी क्रिकेटचे दिवस बदलणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला क्रिकेटमधील कसोटी फॉरमॅटला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.आता लवकरच भारतीय महिला क्रिकेट संघ पाच दिवसीय कसोटी सामने खेळताना दिसणार आहे.भारतीय महिला संघ यावर्षी कसोटी फॉर्मेटमध्ये परतला,त्यानंतर भारतीय संघाने 4 महिन्यांत दोन कसोटी सामने खेळले.दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर महिला संघाची कसोटी क्रिकेटची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.यासोबतच महिलांची चाचणी पाच दिवसांची करण्याची मागणी करण्यात आली.














































































