Last Updated on 06 Apr 2025 2:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील तीर्थक्षेत्र व पर्यटन केंद्र श्रीरामलिंग बेटावरती टाळ मृदूंगाच्या गजरात ‘श्रीरामाच्या’ जयघोषात पारंपरिक पद्धतीने, मंगलमय,धार्मिक व भक्तिपूर्ण वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मकाळ साजरा करण्यात आला.
पहाटे अभिषेक,पूजा आरती करण्यात आली. न्यायाधीश मदन गोसावी (महाराज) यांनी श्रीराम जन्मकाळाचे सुश्राव्य कीर्तन केले.व बहे येथील भजनी मंडळाने भजन साथ केली.
दुपारी साडे बारा वाजता सूर्य डोक्यावरती आला असता सभामंडपात मध्यभागी बांधण्यात आलेल्या पाळण्यावरती श्रीरामाच्या जयघोषात उपस्थित भाविकांनी पुष्पवृष्टी केली व रामजन्मकाळ साजरा करण्यात आला. आरतीनंतर महिलांनी श्रीरामाचा पाळणा म्हटला. उद्योजक प्रसाद पाटील व संजय साळुंखे परिवाराने प्रतिवर्षाप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन यांनी केले. संयोजन येथील तीर्थक्षेत्र रामलिंग बेट देवस्थान समिती, ह.भ.प.लखन कोकीळ महाराज, रवींद्र बडवे, अशोक बडवे, प्रा. मकरंद बडवे, अधिक बडवे, प्रथमेश बडवे, अपूर्व बडवे, अथर्व बडवे, अनुज बडवे तसेच विश्वस्त बडवे-पुजारी यांनी केले.












































































