Last Updated on 22 Nov 2021 9:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे- खरातवाडी परिसरात कृष्णा नदीपात्रात जवळपास १० फूट लांबीची मगर निदर्शनास आली असून नदीकाठच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णा नदी पात्रात बहे पुलाजवळ व खरातवाडी नदीपात्रात मगरीचे दर्शन झाले आहे.ही मगर जवळपास १० फूट लांबीची स्थानिक लोकांच्या निदर्शनास आली आहे.
सर्वत्र मोबाईलवर त्याचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.बहे ग्रामपंचायतीने वनविभागाला तसेच संबंधित विभागांना कळविण्यात आले असल्याचे सरपंच सौ. छायाताई पाटील यांनी सांगितले.
मगर पाहण्यासाठी परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून नदीकाठच्या लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.














































































