Last Updated on 01 Nov 2023 11:41 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बहे (ता. वाळवा) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज,बुधवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.तर सकल मराठा समाजातील युवकांनी बहे येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे.

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलनही यावेळी करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे.वाळवा तालुक्यातही मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत.ग्रामीण भागातील मराठा समाजातील युवा वर्ग आक्रमक झाला.आज,बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.
या लाक्षणिक उपोषणात सरपंच संतोष दमामे,उपसरपंच हणमंत पाटील,राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील,माजी संचालक माणिकराव पाटील,कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील,अॅड.कृष्णराव पाटील,माजी उपसरपंच मनोज पाटील,धनाजी पाटील,दिनकर पाटील,नितीन थोरात,सयाजी पाटील,उमेश शेवाळे,सर्जेराव दमामे,वैभव पाटील,जयदीप पाटील,अभय पाटील,अनिल पाटील,दीपक मोहिते अमर थोरात,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजी पाटील.सर्जेराव पाटील,प्रवीण पाटील,बळीराजा संघटनेचे गणेश शेवाळे तसेच जालिंदर थोरात,अविनाश पाटील,सुरज पाटील,ज्ञानेश पाटील,कीर्तिकुमार पाटील,अतुल पाटील,संदीप थोरात,हणमंत नावडकर-पाटील,रोहित तोरस्कर,विनायक पाटील,जगदीश पाटील,विराज पाटील,तुषार पाटील,मदन अरबुने आदी सहभागी झाले आहेत.
सकल मराठा समाजातील युवकांनी बहे येथे रास्ता रोको आंदोलन केले.त्यामुळे इस्लामपूर-कृष्णा कारखाना रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.दरम्यान,यावेळी युवकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेचे दहन करून आपला निषेध व्यक्त केला.
मुस्लिम समाजाचा पाठिंबा
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बहे (ता. वाळवा) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज,बुधवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणाला बहे येथील मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला आहे.त्याचबरोबर या लाक्षणिक उपोषणात मुस्लिम बांधवही सहभागी झाले आहेत.











































































