Last Updated on 28 Nov 2025 10:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर । फार्णेवाडी (ता. वाळवा) येथील श्री दत्त मंदिर येथे दत्त जयंती उत्सवानिमित्ताने गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे दि. १ डिसेंबर ते गुरुवार ४ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १ डिसेंबर ते ३ डिसेंबर रोजी गुरुचरित्र पारायण सोहळा होणार आहे. यात व्यासपीठ चालक ह.भ.प. संगीता कदम (मसुचीवाडी) या आहेत. ४ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता अभिषेक व महापूजा, नंतर आरती, दुपारी १२ वाजता आरती, नैवेद्य, दुपारी ४ वाजता श्री दत्त जन्मकाळाचे कीर्तन ह.भ.प. दत्तात्रय फसाले यांचे होणार आहे, तर त्यांना साथ माऊली भजनी मंडळाची असणार आहे.
सायं. ५.४५ वाजता पुष्पवृष्टी व आरती होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.














































































