Last Updated on 07 Dec 2021 8:04 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पोलिसांकडून कोणावरही अन्याय होता कामा नये-जयंत पाटील
शिराळा पोलीस ठाण्याचा देशात सातवा क्रमांक आल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार सत्कार
उपाधीक्षक कृष्णात पिंगळे व निरिक्षक नारायण देशमुख यांचे कौतुक
सांगली ।

पोलिसांनी एखादी गोष्ट मनात घेतली तर कुठलीही अवघड गोष्ट ते साध्य करून दाखवतातच.चांगला पोलीस अधिकारी असला की फारच चांगले काम होते.पोलिसांकडून कोणावरही अन्याय होता कामा नये.पोलीस ठाण्यांच्या इमारतींसाठी आणखी निधी देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
शिराळा येथे केंद्रीय गृह मंत्रालय व भारत सरकार यांचेकडून सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाण्याचा देशात सातवा क्रमांक आल्याबद्दल पोलीस उपाध्यक्ष कृष्णात पिंगळे,पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार तसेच कर्मचारी यांचा सत्कार मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम,आ.मानसिंगराव नाईक,पोलीस अधिक्षक दीक्षीत गेडाम,विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोज लोहिया,अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा दुबुले,उपाधिक्षक कृष्णात पिंगळे,पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार,राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विराज नाईक आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम यांनी जो उपक्रम हाती घेतला.त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे रूप बदलले.आधुनिक पोलीस ठाणे म्हणून शिराळा पोलीस ठाण्याचा देशात ७ वा व राज्यात पहिला क्रमांक आला ही बाब अभिमानास्पद आहे.अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हे पोलीस ठाणे चांगले काम करत आहे.पोलीस ठाण्यांच्या इमारतींसाठी आणखी निधी मिळावा,यासाठी प्रयत्न करणार.जेणेकरून पोलिसांत आत्मविश्वास निर्माण होवून ते चांगले काम करतील.
राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, देशात दरवर्षी भारत सरकारकडून पोलीस ठाण्यांचे मुल्यांकन होते.पोलीस ठाणे व तेथील अधिकारी,कर्मचारी यांनी केलेल्या कामाच कौतुक होते.यामुळे पोलीस तत्काळ तक्रारींची दखल घेतात.गुन्ह्यांची नोंद आधुनिक पध्दतीने ठेवली जाते.आधुनिकता यामुळे ठाण्यांना आली आहे.सांगली व शिराळा पोलीस ठाणे व तेथील अधिकाऱ्यांनी देशात सातवा क्रमांत पटकावल्यामुळे संबंध सांगलीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
आ. मानसिंगराव नाईक म्हणाले,पोलीस ठाणेच्या इमारत सुशोभिकरणासाठी मंत्री जयंत पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. चागले अधिकारी असले की लोकाभिमुख कामे होतात.याच उदाहरण शिराळा पोलिस ठाणेकडे पाहिले की होते.शिराळा शहरामध्ये येणारे जाणारे सर्व रस्ते सी सी टीव्ही नी अधिकृत केले पाहीजेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोज लोहिया,पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी मार्गदर्शन केले.
शिराळा नगराध्यक्ष प्रतिभा पवार,उपनगराध्यक्ष विजय दळवी,शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी,माजी जि. प. सदस्य महादेव कदम,शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील,पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे,विराजचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील,सूतगिरणीचे चेअरमन सुरेश चव्हाण माजी उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील,विश्वास कदम,राजू निकम आदी मान्यवर उपस्थित होते.आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबूले यांनी मानले.
उपाधीक्षक कृष्णात पिंगळे व निरिक्षक नारायण देशमुख यांचे कौतुक
पालकमंत्री जयंत पाटील यांनी पोलीस निरिक्षक नारायण देशमुख यांचे विशेष कौतुक केले.ते म्हणाले,पोलिसांनी एखादी गोष्ट मनात घेतली तर कुठलीही अवघड गोष्ट ते साध्य करून दाखवतातच.निरिक्षक नारायण देशमुखांनी इस्लामपुरात अतिशय चांगले काम केले.नूतन निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करावे.देशमुख हे कोणतेही अवघड-काठीण काम ते सहज सोप्या पद्धतीने करतात.कायद्याच्या चौकटीत बसवून गुन्हेगारांना सरळ करण्याचे काम देशमुखांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले.
डीवायएसपी कृष्णात पिंगळे व निरिक्षक नारायण देशमुखांनी इस्लामपूरमधील गुन्हेगारी कमी करण्याचे काम प्रभावीपणे केले आहे.अशा कामांमुळे पोलिसांबद्दल आत्मीयता वाढते.शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी सी.सी. टी.व्ही. कॅमेरा लावल्यामुळे गुन्हेगारांना सहज पकडता येते.टेक्नॉलॉजी वाढते तशी गुन्हेगारीही टेक्नॉलॉजीमुळे वाढत आहे.त्याचबरोबर पोलिसांचे काम टेक्नॉलॉजीमुळे सोपे झाले आहे.









































































