Last Updated on 15 Mar 2021 5:42 PM by
मग १० हजार रुपयांपासून सुरू करु शकता हा व्यवसाय, होईल मोठा नफा
आपल्यापैकी अनेकजण असे असतात ज्यांना ते करत असलेल्या नोकरीत अजिबात रस नसतो मात्र, आर्थिक संकटामुळे आणि उदरनिर्वाह म्हणून ते नोकरी करत असतात. मात्र, असेही काही व्यवसाय आहेत जे तुम्ही कमी गुंतवणुकीत करु शकतात.
कोरोना संकटात अनेकजण बेरोजगार झाले. मोठ्या प्रणामात नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या, अनेकांना व्यवसायात तोटा झाला. अनलॉक झाल्यानंतर काम, उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, अद्यापही नागरिकांसमोर रोजगाराचे संकट कायम आहे. ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे त्यांच्याकडे आर्थिक चणचण असल्यामुळे व्यवसाय बदलावा लागला. अद्यापही रोजगाराचा प्रश्न कायम आहे. तुम्हीही या संकटकाळात नोकरी गमावली असेल तर अगदी कमी पैशातून नवीन व्यवसाय सुरू करु शकता. नोकरीला कंटाळलेल्या व्यक्तींनाही हा व्यवसाय एक चांगला पर्याय आहे. पाहूयात कोणता आहे हा व्यवसाय. (tired of your job then you can start this business from 10 thousand rupees it will give big profit)
ही आहे व्यवसायाची आयडिया
आम्ही पापड बनवण्याच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. हे ऐकायला जरा विचित्र वाटेल पण उत्पन्न करण्याचा एक चांगला पर्याय आहे. चांगली गोष्ट अशी की, जर आपल्याकडे व्यवसायासाठी जागा नसेल तर तुम्ही घरीच हे काम सुरू करु शकता.
किमान १० हजार रुपयांची गुंतवणूक
पापड बनवण्याचा व्यवसाय किमान १० हजार रुपयांमध्येही तुम्ही सुरू करु शकता. जर तुम्ही जास्त गुंतवणूक करु शकत असाल तर हा व्यवसाय २-३ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करुन तुम्ही वाढवू शकतात. जर तुम्हाला व्यवसायासाठी अर्थसहाय्य हवं असेल तर मुद्रा योजने अंतर्गत तुम्ही लाखो रुपयांचे कर्ज सुद्धा घेऊ शकतात. येथे तुम्हाला कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध होईल.
रोक आणि कर्जाची रक्कम एकत्र करा
आपल्याकडे असलेली रोख रक्कम आणि घेतलेल्या कर्जाची रक्कम एकत्र करा. जर तुम्ही सुमारे ६ लाख रुपयांपर्यंतचा निधी जमवला तर तुमच्या व्यवसायाची उत्पादन क्षमता ३०,००० किलोग्रॅम इतकी होईल. जर तुम्ही कमी पैशात हा व्यवसाय सुरू करु इच्छिता तर क्षमता कमी होईल पण व्यवसाय मात्र, सुरू होईल.
व्यवसायासाठी किती जागा लागेल?
पापड बनवण्यासाठी तुम्हाला २५० स्वेअर फूट जागेची आवश्यकता लागेल. जर तुमच्या घरातील हॉल इतका मोठा असेल किंवा त्यापेक्षा थोडा लहान असेल तरी काम केले जाईल. उर्वरित जागा तुम्ही भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू करु शकतात.
या गोष्टी आवश्यक असतील
पापड व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला मिक्सर, प्लॅटफॉर्म बॅलन्स, स्विफ्टर, २ ओव्हन, सिलिंडर, संगमरवरी टेबल टॉपसह इतरकाही मशीनची आवश्यकता असेल. तुम्ही वापरणार असलेले भांडे अॅल्युमिनियमचे असावेत.
कशी होणार प्रोडक्ट विक्री
आजचे युग हे पूर्णपणे ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे तुम्ही आपले प्रोडक्ट ऑनलाईन माध्यमातून विकू शकता. उर्वरित पापड हे ऑफलाईन माध्यमातूनही तुम्ही विक्री करु शकतात. यासाठी तुम्ही घाऊक किंवा किरकोळ व्यापाऱ्यांशी संपर्क साधावा.
किती होईल कमाई?
अंदाजानुसार, पापड व्यवसायातील नफ्यात गुंतवणुकीच्या रकमेचा पाचवा हिस्सा असतो. जर तुम्ही ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला दरमहा १ लाख रुपये मिळतील आणि यात तुमचा नफा ३५-४० हजार रुपयांपर्यंत असू शकतो असा अंदाज आहे.














































































