Last Updated on 05 Jun 2020 3:33 PM by
उंचावरून पडणारे दुधासारखे शुभ्र पाणी, त्या पाण्याचा येणार प्रचंड आवाज, अवती-भोवतीची उंचसखल जमीन आणि वनराई. तुमच्याही डोळ्यासमोर एखाद्या धबधब्याचे चित्र उभे राहिले असेल.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका धबधब्याची सफर करायला नेणार आहोत. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा दोन देशांना विभागण्याचे काम करतो. मोकोना फॉल्स नावाने ओळखला जाणार हा धबधबा अर्जेंटिना व ब्राझीलच्या सीमेवर आहे. हा जगातील एकमेव असा धबधबा आहे जो नदीसोबत समांतर वाहतो.
अर्जेंटिना व ब्राझीलच्या मध्ये असणाऱ्या या धबधब्याला दोन्ही देशांत वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. अर्जेंटिनामध्ये याला मोकानो फॉल्स म्हटले जाते तर ब्राझीलमध्ये याचे नाव इग्वाजू फॉल्स आहे. याची लांबी ३ किमी व उंची २५ मीटर आहे.
मोकानो फॉल्सचे वैशिष्ट्य म्हणजे याचा प्रवाह पाच महिने कमी असतो. यादरम्यान लोक इथे वॉटर स्पोर्टचा आनंद लुटण्यासाठी येतात. या धबधब्यावर मालकी हक्क गाजवण्यासाठी दोन्ही देशांनी अनेक प्रयत्न केले. हा धबधबा पोस्डास शहरापासून ३३७ किमी व इगूजू फॉल्सपासून ३३२ किमी अंतरावर वाहतो.
या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी दोन्ही देशांनी उद्याने बनवली आहेत. वनराईने वेढलेल्या या परिसरात बिबट्यादेखील आढळतो. १९४७ मध्ये या ठिकाणी टर्वो स्टेट उद्यान उभारण्यात आले होते. हे उद्यान आता बंद आहे. याशिवाय अर्जेंटिनाने इथे मोकाना प्रोव्हेंशिअल पार्क बनवले होते. आठवड्याच्या शेवटी टूरिस्ट इथे येऊन वेळ घालवतात. तीन हजार मीटर लांब अशा या धबधब्यामुळे इथे राहणारे लोक स्विमिंग पूलचा आनंद लुटतात आणि त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागत नाही.













































































