Last Updated on 09 Oct 2022 12:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । सणासुदीच्या काळात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,रविवारी देशात गेल्या 24 तासात 2 हजार 756 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
आरोग्य विभागाने रविवारी सकाळी ७ पर्यंत दिलेल्या माहितीनुसार,देशातील 3 हजार 393 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे देशात आजपर्यंत एकूण 4,40,54,621 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.75 टक्के एवढे झाले आहे.भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 28,593 इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.06 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासांत, 2,756 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत, 2.39,546 कोविड-19 चाचण्या भारतात पार पडल्या असून एकत्रित चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 89.69 कोटी (89,69,87,772) इतकी आहे.
आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 218.97 (2,18,97,88,104) कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 मार्च 2022 पासून 12 ते 14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.10 कोटीहून (4,10,72,203) अधिक किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.










































































