Last Updated on 20 Oct 2021 5:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रेशनपासून प्रशासनापर्यंत, मोफत उपचारांपासून स्वस्त दरात औषधांपर्यंत बहुतेक सुविधा अधिकाधिक भारतीयांना उपलब्ध होत असतील तर त्याचे कारण आहे- भक्कम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गेल्या सात वर्षात सातत्याने होत असलेल्या सुधारणा.याच साखळीअंतर्गत देशाच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारक परिवर्तन आणणाऱ्या आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य मिशनची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलीआहे जी रुग्णांना आणि आरोग्य सेवा प्रदात्यांचे जीवन सुकर बनवण्यासाठी एक आरोग्य संग्रह म्हणून काम करेल आणि तयार करेल नव्या भारताचे नवे आरोग्य मॉडेल एकीकृत व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे आणि सुलभ सुविधा पुरवणे हा विद्यमान केंद्र सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे.
दर्जेदार उपचारांसोबत महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने आयुष्मान भारत पीएम जय योजना सातत्याने कार्यरत आहे. त्याचाच परिणाम म्हणून या योजनेंतर्गत 2 कोटीपेक्षा जास्त गरीब आणि मध्यमवर्गातील लोकांनी मोफत उपचारांचा लाभ घेतला आहे. ज्यामध्ये निम्मी संख्या महिलांची आहे. सर्वांना उत्तम उपचार मिळावेत, समान पद्धतीने मिळावेत, या दिशेने केंद्र सरकारने आता आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य मिशनच्या रुपात एक क्रांतिकारी पुढाकार आहे. हे एक असे आरोग्य मॉडेल आहे ज्याचा उद्देश समावेशक, सुलभ आणि आजारांपासून बचाव करण्यावर भर देणारा आहे. हे मिशन प्रत्येक नागरिकासाठी एका डिजिटल आरोग्य ओळखपत्राच्या रुपात असेल जे त्याच्या आरोग्य खात्याच्या स्वरुपात काम करेल. यामध्ये त्यांच्या आरोग्याचा रेकॉर्ड डिजिटल स्वरुपात समाविष्ट केला जाईल. आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य मिशनद्वारे देशाच्या आरोग्याचे परिदृश्य तर बदलेलच पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांना मिळणारी प्रत्येक आरोग्य सुविधा तंत्रज्ञानाने युक्त होईल.
पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ल्याच्या चबुतऱ्यावरून राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या पथदर्शी प्रकल्पाची घोषणा केली होती जी सध्या सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रारंभिक टप्प्यात लागू आहे. पण आता ही योजना राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे. जनधन, आधार आणि मोबाईल( जॅम) ट्रिनिटी आणि सरकारच्या इतर डिजिटल पुढाकाराच्या रुपात तयार पायाभूत सुविधांच्या आधारावर डिजिटल आरोग्य मिशन आरोग्य सेवांशी संबंधित सर्व लोकांना एका मंचावर आणणारे हे पाऊल आहे.
उपचारांच्या फाईलच्या ओझ्यापासून मुक्ती
नव्या रुग्णालयात किंवा नव्या शहरात जेव्हा रुग्ण जातो तेव्हा त्याला पुन्हा नव्याने तपासणी आदी प्रक्रियांमधून जावे लागते. यामुळे न केवळ
राष्ट्र डिजिटल आरोग्य मिशन
रुग्ण आणि डॉक्टर यांचा वेळच वाया जात नाही तर मेडीकल रेकॉर्डच्या अभावी योग्य प्रकारचे उपचार मिळण्यामध्ये विलंब देखील होतो. पण या नव्या मिशनमुळे या सर्व कटकटींपासून मुक्ती मिळेल कारण आता रुग्णांचा सर्व रेकॉर्ड डिजिटल स्वरुपात ठेवला जाणार आहे. हे मिशन आरोग्याशी संबंधित प्रत्येक लाभधारकांना एकत्रितपणे एका मंचावर आणणार आहे. या मिशनचा सर्वाधिक लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गाला होईल. याचा आणखी एक फायदा म्हणजे रुग्णाला देशात कुठेही असा डॉक्टर शोधता येईल ज्याला रुग्णाची भाषा येत असेल आणि समजत असेल आणि त्याच्या आजारावर उत्तमात उत्तम उपचार करण्याचा अनुभव असेल. केवळ डॉक्टरच नव्हे तर अधिक चांगल्या चाचण्या करण्यासाठी लॅब्ज आणि औषधांची दुकाने सुद्धा निवडता येतील.
आरोग्य सुविधांचा वाढता आधार
देशाच्या आरोग्य सुविधांना बळकट करण्याचे जे अभियान सुरू आहे, त्याचा या मिशनच्या माध्यमातून एका नव्या टप्प्यात प्रवेश झाला आहे. यामध्ये भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणण्याची मोठी क्षमता आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेचा हा पुढचा टप्पा आहे ज्याची सुरुवात तीन वर्षांपूर्वी अंत्योदयचे प्रणेत पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी करण्यात आली होती. देशात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विकास आणि दर्जेदार उपचारांच्या सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी नवे आरोग्य धोरण तयार करण्यात आले. आज देशात एम्स सारख्या खूप मोठ्या आणि आधुनिक आरोग्य संस्थांचे जाळे उभारण्यात येत आहे. प्रत्येक तीन लोकसभा क्षेत्रांदरम्यान एका वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी प्रगतीपथावर आहे. आज गावे आणि घरांच्या जवळच प्राथमिक आरोग्यसेवांशी संबंधित जाळ्यांना हेल्थ ऍन्ड वेलनेस सेंटरद्वारे बळकट केले जात आहे. आतापर्यंत अशी सुमारे 80,000 केंद्रे सुरु झाली आहेत. आता आयुष्मान भारत- डिजिटल मिशन रुग्णालयातील प्रक्रिया सुलभ करण्याबरोबरच इझ ऑफ लिव्हिंगमध्ये देखील वाढ करेल. सध्या रुग्णालयांमध्ये तंत्रज्ञानाचा जो वापर केला जातो तो केवळ एकाच रुग्णालयापुरता किंवा एकाच समूहापुरता मर्यादित असतो. आरोग्य क्षेत्रामध्ये पीएलआय योजना आत्मनिर्भर भारत निर्मितीच्या संकल्पाला बळकट करत आहे.
तंत्रज्ञानाद्वारे भविष्यासाठी देखील सज्ज होत आहे भारत
भारतात ज्या प्रकारे तंत्रज्ञानाला सुशासन आणि त्यामध्ये सुधारणांचा आधार बनवले जात आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिक सशक्त होत आहे. डिजिटल इंडिया अभियानाने भारतातील सामान्य लोकांना डिजिटल तंत्रज्ञानाने जोडून देशाची ताकद कैक पटींनी वाढवली आहे. आज देशात 130 कोटी आधार क्रमांक, 118 कोटी मोबाईल ग्राहक, सुमारे 80 कोटी इंटरनेट वापरकर्ते, सुमारे 43 कोटी जनधन बँक खाती एवढ्या मोठ्या परस्परांशी जोडलेल्या पायाभूत सुविधा जगात कुठेही नाहीत. भारतात सरकारी रेशन लोकांना सहज उपलब्ध असो किंवा प्रशासकीय कामकाजासाठी तंत्रज्ञानाचा वापर असो आता सामान्य भारतीयाला देखील त्याची जाणीव होऊ लागली आहे. यूपीआयच्या माध्मयातून कुठेही कधीही डिजिटल व्यवहारांमध्ये भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. त्याच प्रकारे ‘सर्वांना लस मोफत लस’ अभियानांतर्गत आज भारताला लसींच्या जवळ जवळ 90 कोटी मात्रा देणे शक्य झाले आहे आणि याचा पूर्ण रेकॉर्ड उपलब्ध आहे तर यामध्ये कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मची भूमिका महत्त्वाची आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कालखंडात निरोगी भारताचा मार्ग भारताचे मोठे संकल्प सिद्ध करण्यासाठी आणि मोठ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी खरोखरच आवश्यक आहे. यासाठी सर्वांना एकजुटीने प्रयत्न करावे लागतील आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व व्यक्ती, डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी, आरोग्य संस्था या सर्वांना ही नवी व्यवस्था जलदगतीने आत्मसात करणे गरजेचे आहे.
सुविधा आणि फायदे
• आधुनिक आरोग्यसेवा प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांचे सशक्तीकरण. नागरिक आणि आरोग्य व्यावसायिकांच्या आरोग्य रेकॉर्डपर्यंत सहज पोच
• खाजगी आरोग्य सेवा क्षेत्र असतील यामध्ये भागीदार, आरोग्य सेवा प्रदाता होतील अधिक सोपे आणि उत्तरदायी
• आरोग्य ओळखपत्रः कोणत्याही व्यक्तीचा आरोग्यविषयक रेकॉर्ड ठेवण्यासाठी मोबाईल आणि आधार क्रमांकाशी जोडलेले एक विशिष्ट ओळखपत्र
• आरोग्यसेवा व्यावसायिक नोंदणीः नोंदणीकृत परिचारिका, डॉक्टर, पॅरामेडिकल्सची योग्यता, अनुभव आणि इतर माहितीचा कोष
• आरोग्य सुविधा नोंदणीः देशात उपलब्ध सरकारी आणि खाजगी आरोग्य सुविधांची माहिती
• वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड ऍप्लिकेशनः आरोग्य सेतू ऍपशी संलग्न कोणत्याही व्यक्तीचा स्वयं- व्यवस्थापित आरोग्य रेकॉर्ड
• डॉक्टरांपर्यंत पोहोचणे होईल सुलभ आणि लोकांच्या फायद्यासाठी आरोग्य सेवांना कुशल बनवण्यात येईल.
• या योजनेमुळे दूर्गम आणि शहरी भागातील लोकांना समान स्वरुपात मिळणार मदत. तळाच्या पातळीवरही किफायतशीर आरोग्य सुविधा मिळणार.
• डेटाच्या गोपनीयतेला सर्वोच्च महत्व दिले जाईल.










































































