Last Updated on 27 Sep 2021 4:08 AM by Sanjay Patil/Adhorekhit
दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या वार्षिक सभेत अण्णासाहेब डांगे यांची माहिती
अहवाल सालात सूतगिरणीस १ कोटी १८ लाख रूपयाचा नफा

सांगली : गेल्या २० वर्षात दीनदयाळ सुतगिरणीला ४४ कोटीचा नफा झाला आहे. सभासद, संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्या मोलाच्या सहकार्याने हे यश मिळवणे शक्य झाले आहे.शिस्तबध्द व काटेकोर कामाच्या पध्दतीमुळे हे शक्य झाले आहे. आदर्श कारभारामुळे सुतगिरणी नावारूपास येत आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केले.दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, जि. प. सदस्य संभाजी कचरे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अॅड.राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,अॅड. संपतराव पाटील, चेअरमन एम. एन. कांबळे, व्हा. चेअरमन प्रकाश बिरजे,कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश खरात,अशोकराव देसाई, किसनराव गावडे, सी. एच. पाटील, विकास नांगरे, संजय हवलदार, पांडूरंग पाटील, पांडूरंग वाघमोडे, शिवाजीराव डांगे, परेश पाटील, राजेश माने, दिपक आडसूळ, सुमित चंद्रकांत पाटील, संचालक सुमंत महाजन, रमेश वडे, डॉ. शिवाजीराव जाधव, राजेंद्र लोंढे, उमेश गावडे आदी उपस्थित होते.
डांगे म्हणाले, दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनुसार वाटचाल सुरू असल्याने सूतगिरणीची प्रगती सुरू आहे. सभासदांच्या विश्वासामुळेच संस्थेला आजपर्यंत ४४ कोटींचा नफा झाला आहे. त्यामुळे संस्थेची मालमत्ता २० वर्षात ९५ कोटींवर गेली आहे. कोरोनाकाळातही संस्थेने नफ्याची परंपरा कायम राखली आहे.अहवाल सालात सूतगिरणीस १ कोटी १८ लाख रूपयाचा नफा झाला आहे.

यावेळी आदर्श कामगार पुरस्काराचे वितरण करण्यात आले.पुरस्काराचे वितरण संस्थापक अण्णासाहेब डांगे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रथम क्रमांक दिपक आनंद थोरात (रेठरेधरण), व्दितीय क्रमांक रघुनाथ बाबुराव कळसे (भटवाडी) तृतीय क्रमांक सागर अर्जुन बडदे (जांभळवाडी), उत्तेजनार्थ दिलीप रामचंद्र कांबळे, (नवेखेड), विकास तुकाराम खोत (लादेवाडी), ज्ञानदेव बाबुराव शिंदे (नवेखेड), रामदिनेश शंकर (ओरिसा) या कामगारांना अनुक्रमे रोख रक्कम व संस्थेचे सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.
प्रारंभी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रकाश बिरजे यांनी स्वागत केले. एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अॅड. चिमण डांगे यांनी सभेचे नोटीस वाचन केले. कामगार दीपक थोरात, रघुनाथ कळसे, साखर बडदे, दिलीप कांबळे, विकास खोत, ज्ञानदेव शिंदे, राम शंकर यांचा गौरव करण्यात आला. संजय देवकुळे यांनी आभार मानले. ए. के. पाटील व बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. संचालक माणिक गोतपागर, अनिल शेटके, शोभा व्होनमाने, अमोल चौधरी, मंगल पवार, विलास काळेबाग, अशोक एडगे यांनी ठराव मांडले.










































































