Last Updated on 28 Jan 2024 2:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । दिव्यांग व्यक्तीही समाजाचा मुख्य घटक असून दिव्यांग व्यक्तींना वेग-वेगळ्या पध्दतीने आधार आणि आत्मसन्मान दिल्यास त्यांच्यामध्ये दृढ आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो,असा विश्वास माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
वाळवा पंचायत समिती व भारतीय कृत्रिम अंग निर्माण (एलिम्का) कानपुर यांच्या संयुक्त विद्यमाने वाळवा तालुक्यातील ३२९ दिव्यांगांना तीन चाकी सायकल,श्रवण यंत्रे,आधार काठीसह अद्यावत साहित्य वाटप करण्यात आले.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ.मानसिंग नाईक,प्रा.शामराव पाटील,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार,सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभारएलिम्काच्या अभिलाषा ढोरे,तालुका आरोग्यधिकारी डॉ.साकेत पाटील,महिला व बाल कल्याणचे प्रकल्पाधिकारी सतिश नवले प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी १४ किलो व्याट क्षमतेच्या,७ लाख ३१ हजार खर्चाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.
आ.नाईक म्हणाले,आजचा दिवस दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आनंद फुलविणारा आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण व स्वयंरोजगारच्या क्षेत्रात संपूर्ण राज्यात प्रभावी काम झाले आहे.
डॉ.आबासाहेब पवार म्हणाले,काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार आजचे साहित्य वाटप केले जात आहे. पर्यावरणाच्या बदलातून भविष्यात अनेक आव्हाने उभा रहाणार आहेत. त्यामूळे आम्ही अपारंपरिक उर्जेला प्राधान्य देणार आहोत. शाळा,अंगणवाड्या,पाणी पुरवठा योजनेत सौर ऊर्जेचा वापर वाढविणार आहोत.
अभिलाषा ढोरे यांनी एक व्यक्ती काही करू शकत नाही.मात्र एकमेकांचे हात हातात घेत मोठे काम उभा राहू शकते,याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे साहित्य वाटप आहे,अशी भावना व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने,नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,डॉ.प्रियांका पाटील,कक्ष अधिकारी अलका पाटील,विस्तार अधिकारी सुहास पाटील,सुनिता शिंदे,जयंत दारिद्र्य अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे,शशिकांत सन्मुख,आनंदराव खडके,अभिमन्यू पाटील,सुनिल कचरे यांच्यासह तालुक्यातील दिव्यांग व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
प्रारंभी सहाय्यक गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी (शिक्षण) छाया माळी यांनी आभार मानले.









































































