Last Updated on 20 Dec 2021 2:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
UPDATED : 20 DEC 2021 9:27AM
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यन्त एकूण 137 कोटी 67 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 82 हजार 267 गेल्या 572 दिवसांतील सर्वात कमी
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 टक्केपेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.24 टक्के आहे.
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.39 टक्के;मार्च 2020 पासून सर्वात अधिक
गेल्या 24 तासात 8 हजार 077 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,41,87,017
गेल्या 24 तासात 6,563 नवीन रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात 15 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ( 0.75 टक्के ) ,गेले 77 दिवस 2 टक्के पेक्षा कमी.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ( 0.60 टक्के) ,गेले 36 दिवस 1 टक्केपेक्षा कमी.
आतापर्यंत एकूण 66.51 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
आतापर्यंत देशात ओमीक्रॉनचे 159 रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 8,077 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,41,87,017 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.39 टक्के झाला आहे.

सलग 53 दिवसांपासून 15 हजारपेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
गेल्या 24 तासात 6 हजार 563 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 82 हजार 267 असून 572 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.उपचाराधीन रुग्ण,एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.24 टक्के असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्या क्षमता व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 8,77,055 चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत 66.51 कोटीहून अधिक (66,51,12,580) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.60 टक्के असून गेले 36 दिवस 1 टक्केपेक्षा कमी आहे.दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.75 टक्के असून गेले 77 दिवस 2 टक्केपेक्षा कमी आणि 112 दिवस 3 टक्केपेक्षा कमी आहे.














































































