Last Updated on 05 Aug 2021 3:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाला दिल्या हटके शुभेच्छा
मुंबई : भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. दरम्यान, भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला 5-4 ने धूळ चारली आहे. भारताने तब्बल 41 वर्षांनतर हॉकीमध्ये पदक जिंकले आहे. शेवटचे पदक भारतीय संघाने 1980 मध्ये वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वात जिंकले होते. त्यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ नाराशाचा हाती आली होती. भारतीय संघाच्या या दमदार कामगिरीमुळे संपूर्ण भारतातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हणाले जयंत पाटील?
भारतीय संघाने 41 वर्षांनंतर पदक जिंकल्यामुळे जयंत पाटील यांनी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करत म्हटले की, तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया. भारतीय संघाला आज 41 वर्षांनंतर कांस्यपदक मिळवता आले. हॉकी संघाने मिळवलेले हे यश भारतीयांचे उर भरुन आणणार आहे असं पाटील म्हणाले.

! They kept their cool despite trailing 3-1 and did the #CorrectKaryakram at the right time. Congratulations for this emphatic win. You brought glory to India at #Olympics
after 41 years. #Hockey
#BronzeMedal














































































