Last Updated on 19 Oct 2021 5:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
घर म्हणजे आपली वास्तू चुकीच्या पद्धतीने बांधल्यास आपल्या घऱात आयुष्यभर संकटे येत असतात. घरात सुख- शांती, उत्तम आरोग्य हवे असल्यास घराची मांडणी आणि बांधणी हे खूप महत्त्वाचे असते. घराचे बांधकाम करताना अनेकजण वास्तुविशारदाचा सल्ला घेत असतात.परंतु त्यानंतर काही चुका घरात राहणाऱ्या व्यक्तींकडून होत असल्याने वास्तू व्यवस्थित राहूनही शांती आणि स्वास्थ लाभत नाही.त्यामुळे घरात राहणारे व्यक्ती सुखी राहत नाहीत. घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा,आजारपण,गरिबी, नुकसान,अपयश येत असते.घरातील कोणत्याच कार्याला यश येत नाही.यामुळे घरात दुख आणणारे, नकारात्मकता आणणाऱ्या गोष्टी कोणत्या याविषयी जाणून घेऊ.तुमच्याही घरात अशा वस्तू नाहीत ना याची माहिती करून घ्या.
तुटलेल्या ताटामुळे वाढते कर्ज
वास्तुविशारदाच्या मते. घऱात तुटलेले ताट असणे खूप नुकसानकारक असते.घरात कोणतीच वस्तू तुटलेली नसावी.कधीच तुटलेली किंवा तडा गेलेले ताट नसावे.अशा तुटलेल्या ताटातून जेवण केल्यास किंवा दुसऱ्याला दिल्यास घरातील सदस्यांवर कर्जाचे संकट येत असते.शिवाय घरात कोणते ना कोणते आर्थिक समस्या येत असतात.
तुटलेला पलंगामुळे घरातील समस्या वाढते
जर घरात कोणता तुटलेला पलंग असेल किंवा खाट असेल तर तुमच्या समस्या नेहमी वाढत असतात.वास्तुविशारदाच्या मते,घरात कधीच तुटलेला बेड म्हणजेच पंलग राहू देऊ नये.याशिवाय घरातील दक्षिण बाजूच्या भिंतीवर आरसा लावू नये.यामुळे घरातील महिला सुखी राहत नाहीत.शक्य असेल तर घराच्या उत्तरेला आठ कोन असलेला आरसा लावावा. जेणेकरुन घरात कोणतीच समस्या येत नाही.
घरात बंद घड्याळ असणे हे अशुभ
घराच्या भिंतीवर असूद्या किंवा हाताच्या मनगटांवर,घरात बंद घड्याळ असणे हे वास्तूशास्त्रात अशुभ मानले जाते.घड्याळला सुख आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते.जर आपल्या घरातदेखील कोणत्याही भिंतीवर तुटलेली घड्याळ किंवा बंद पडलेली घड्याळ असेल तर तिला दिवाळीआधी घराबाहेर फेकून द्या. नाहीतर त्याचे दुष्प्रभाव तुमच्यावरही पडू शकतो.तसेच,एका बाजूला चालू असलेले घड्याळ जे जीवनाचे कालचक्र दर्शविते. तर दुसरीकडे बंद पडलेली घड्याळे आयुष्यातील अडथळे व समस्या दर्शवतात. घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर ते त्वरित काढून टाकले पाहीजे. असे मानले जाते की, बंद घड्याळे तुमचा वेळ चांगला जावू देत नाहीत आणि जीवनातील आनंदात अडथळा निर्माण करतात.
घरात तुटलेल्या मूर्ती ठेवू नका
घरात कधीही देवाची तुटलेली मूर्ती ठेवू नये.विशेष म्हणजे फक्त दिवाळीच्या काळातच नाही तर नेहमी घरात देवाच्या तुटलेल्या मूर्ती ठेवू नये.कारण ते अपशकून मानले जाते.जर तुमच्या घरात देवाची तुटलेली मूर्ती असेल तर त्या मूर्तीचे दिवाळीआधी विसर्जन करा आणि नवी मूर्ती घरातील मंदिरात स्थापित करा.
घरात तुटलेला काच ठेवू नका

घरात तुटलेला काच तर अजिबात ठेवू नका.तुमच्या घरात खिडकीचा, कपाटीचा किंवा आरशाचा काच तुटलेला असेल तर त्याला ताबडतोब घराबाहेर काढा. कारण घरात तुटलेला काच ठेवू नये, असे बोललं जाते.कारण तुटलेल्या काचेमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, असे मानले जाते.
घरातील विजेचे उपकरणे ठीक करा
घरातील विजेचे उपकरणं खराब झाले असतील तर ते दिवाळीआधी लवकरता लवकर चांगली करा.कारण दिवाळी सण लखलखात आणि तेजोमयचा प्रतिक मानला जातो. अशावेळी घरातील ट्यूबलाईट, बल्ब सुरु असायला हवेत. दिवाळीच्या दिवसांमध्ये अंधाऱ्याला अशुभ मानलं जातं. त्याचा आपल्या प्रकृतीवरही परिणाम पडतो.
जुनी वर्तमानपत्रे
![]()
काही लोकांना जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते. ती त्यांच्या घरात साठत जातात. वास्तुमध्ये हे फारच चुकीचे मानले जाते. जुन्या वर्तमानपत्रांवर धूळ आणि माती जमा होते. आणि त्यामुळे तिथे कीटकांच्या उत्पत्तिची भीती असते. या सर्व गोष्टींमुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होतात आणि प्रगतीस बाधा येते. त्यामुळे वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवा.
जुने कुलूप
![]()
वास्तू विज्ञानाच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे फारच अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जे लॉक वापरात येत नाहीत किंवा खराब झाले आहे, त्या त्वरित काढल्या पाहिजेत. असं म्हणतात की खराब कुलूप नशीबसुद्धा कायमचे बंदिस्त करते आणि या सोबत प्रगतीचा मार्ग देखील बंद होतो.
खराब बुट आणि चप्पल
![]()
ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात, खराब झालेले बुट आणि तुटलेली चप्पल वापरणे फारच अशुभ असते. शास्त्रानुसार घरात खराब बुट ठेवणे जीवनातील संघर्ष दर्शवते. जरी तुमच्याकडे कमी चप्पल असतील तरीही जे आहेत, ते योग्य स्थितीत आणि स्वच्छ असावेत. शनिवारी खराब झालेले शूज घराबाहेर फेकून द्यावेत. यामुळे शनिची अशुभ दशा देखील कमी होते.
जुने-फाटलेले कपडे
![]()
वास्तूशास्त्रानुसार, आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्यातून आपले भाग्य दिसते. चुकूनही घरात असे फाटलेले कपडे किंवा फार जुने झालेले कपडे ठेवू नयेत. असे म्हणतात की फाटलेले कपडे तुमच्या कारकीर्दीत पुन्हा पुन्हा अडचणी निर्माण करतात.
स्वयंपाकघरात औषधे ठेवू नका
बरेच लोक स्वयंपाकघरात औषधी ठेवतात जे चुकीचे आहे. वास्तुशास्त्रानुसार औषध कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. असे केल्याने आजार वाढण्याची शक्यता असते असे मानले जाते. खराब आरोग्यामुळे उपचारांमध्ये बराच पैसा खर्च होतो. यामुळे घरात आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
(टीपः या लेखात दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. ‘अधोरेखित’ याची पुष्टी करत नाही)














































































