Last Updated on 26 Sep 2021 2:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
घरच्या घरी झटपट बनवता येणाऱ्या रव्याच्या डोश्याची पाककृती जाणून घेऊयात..
साहित्य : बारीक रवा, जाड पोहे, डाळीचे पीठ, मीठ, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, सोडा
कृती :
- बारीक रवा 1 वाटी, अर्धी वाटी डाळीचे पीठ, डोश्याचे बटर जसे असते एवढे पातळ भिजवून घ्या.
- जाड पोहे भिजवून घ्या आणि मिक्सर मधून काढून घ्या . हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्या .
- या मिश्रणात मीठ, चिमूटभर खायचा सोडा घालून मिश्रण 10 मिनिटे भिजत ठेवा.
- तवा चांगला गरम झाल्यावर तव्याला तेल न लावता लहान आकाराचे डोसे घालायला सुरुवात करा.
- डाळीच्या पीठामुळे डोसा लालसर भाजल्यावर आतल्या बाजूनेच गरम मसाला भुरभुरून टाका.
- त्यावर कांदा , टोमॅटो मध्यभागी उभी लाईन मध्ये सजवा. आणि डोसा रोल करून तव्यावरून काढून घ्या …










































































