Last Updated on 24 May 2020 6:37 PM by
क्रिकेट मैदानावर जेवढी महत्त्वाची भूमिका खेळाडूंची असते,तेवढीच महत्त्वाची भूमिका पंचाचीही असते. पंचाचा एक चुकीचा निर्णय संपूर्ण सामन्याचे चित्र पालटू शकतो. त्यामुळे आयसीसी पंचाची निवड करताना खूप दक्षता बाळगून करत असते.पण खूप कमी जणांना हे माहिती आहे की,या पंचांना त्यांच्या कामासाठी किती पैसे मिळतात.त्यांची कसोटी, वनडे आणि टी२० सामन्यांची रक्कम वेगळी असते.त्याबरोबरच त्यांना लाखोंमध्ये वार्षिक पगार दिली जातो.
जगातील काही नामांकित आणि महागड्या पंचांविषयी
अलिम दार
पाकिस्तानचे माजी खेळाडू अलिम दार हे क्रिकेट जगातील सर्वोत्कृष्ट पंच आहेत.दार हे विश्वचषक २००३, २००७ आणि २०११ अशा अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात पंच होते.एवढेच नाही तर, त्यांना २००९-१०मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पंच (अंपायर ऑफ द ईयर) म्हणून निवडण्यात आले होते.काही वेबसाईटनुसार, दार यांना कसोटीसाठी २ लाख १० हजार८७४ रुपये, टी२० साठी ७० हजार२९१ रुपये आणि वनडेसाठी १लाख ५४ हजार ६४१ रुपयांसारखी मोठी रक्कम दिली जाते. या सगळ्या व्यतिरिक्त त्यांची वार्षिक पगार ही ३१ लाख ६३ हजार ११७ रुपये इतकी असते.
पॉल रिफेल
ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू पॉल रिफेल यांनी २००४ मध्ये पंच क्षेत्रात पदार्पण केले. रिफेल यांना टी२० सामन्यांसाठी आयसीसीकडून ७० हजार २९१ रुपये मिळतात. तर, कसोटीसाठी २ लाख १० हजार ८७४ आणि वनडेसाठी १ लाख ५४ हजार ६४१ रुपये मिळतात. शिवाय त्यांची वार्षिक पगार ही ३१ लाख ६३ हजार ११७ रुपये इतकी आहे.
क्रिस गफाने
क्रिकेट जगतातील शानदार पंचांपैकी एक असणाऱ्या क्रिस गफाने यांना आयसीसीच्या इलिट पॅनलमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे.गफाने यांना वनडेसाठी १ लाख ५४ हजार ६४१ रुपये, टी२०साठी ७० हजार २९१ रुपये आणि कसोटीसाठी २ लाख १० हजार ८७४ रुपये दिले जातात. तसेच त्यांची वार्षिक पगार ही ३१ लाख ६३ हजार ११७ इतकी आहे.
नाइलेज लॉन्ग
नाइलेज लॉन्ग हेदेखील जगातील सर्वात महागड्या पंचापैकी एक आहेत.त्यांना आयसीसीकडून टी२०साठी ७० हजार २९१ रुपये, वनडेसाठी १ लाख ५४ हजार ६४१ रुपये आणि कसोटीसाठी २ लाख १० हजार ८७४ रुपये दिले जातात.त्याबरोबरच त्यांची वार्षिक पगार ही ३१ लाख ६३ हजार ११७ रुपये इतकी आहे.
कुमार धर्मसेना
श्रीलंकाचे माजी क्रिकेटपटू कुमार धर्मसेना यांना कसोटीसाठी २ लाख १० हजार ८७४ रुपये, वनडेसाठी १ लाख ५४ हजार ६४१ रुपये आणि टी२० साठी ७० हजार २९१ रुपये दिले जातात.तर त्यांना आयसीसीकडून वर्षभराचे २४ लाख ६० हजार रुपये मिळतात.
रिचर्ड केटलेबरो
२०११ मध्ये रिचर्ड केटलेबरो यांना आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये सामाविष्ट करण्यात आले होते.त्यांना कसोटीसाठी २ लाख १० हजार ८७४ रुपये, वनडेसाठी १ लाख ५४ हजार ६४१ रुपये आणि टी२० साठी ७० हजार २९१ रुपये दिले जातात.तर त्यांची वार्षिक पगार ही २४ ६० हजार रुपये इतकी आहे.
ब्रूस ऑक्सनफोर्ड
ब्रूस ऑक्सनफोर्ड यांनी २००१ मध्ये त्यांच्या पंच कारकिर्दीची सुरवात केली होती.त्यांना आयसीसीकडून टी२० सामन्यासाठी ७० हजार २९१ रुपये, वनडेसाठी १ लाख ५४ हजार ६४१ रुपये आणि कसोटीसाठी २ लाख १० हजार ८७४ रुपये मिळतात. शिवाय त्यांची वार्षिक पगार ही २४ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
रॉड कटर
रॉड कटर यांना आयसीसीक़ून कसोटीसाठी २ लाख १० हजार ८७४ रुपये, टी२० सामन्यासाठी ७० हजार २९१ रुपये आणि वनडेसाठी १ लाख ५४ हजार ६४१ रुपये मिळतात. याबरोबरच त्यांची वार्षिक पगार ही २४ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
मराइस इरास्मस
मराइस इरास्मस हे खूप शानदार पंच आहेत. त्यांना टी २० सामन्यासाठी ७० हजार २९१ रुपये, वनडेसाठी १ लाख ५४ हजार ६४१ रुपये आणि कसोटीसाठी २ लाख १० हजार ८७४ रुपये मिळतात. शिवाय त्यांची वार्षिक पगार ही २४ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
रिचर्ड इलिंगवर्थ
आयसीसी रिचर्ड इलिंगवर्थ यांना कसोटीसाठी २ लाख १० हजार ८७४ रुपये, वनडेसाठी १ लाख ५४ हजार ६४१ रुपये आणि टी२० साठी ७० हजार २९१ रुपये दिले जातात.तर वर्षभराचे त्यांना २४ लाख ६० हजार रुपये मिळतात.
इयान गोल्ड
इंग्लंडचे माजी खेळाडू हे आयसीसीच्या एलिट पॅनलचा भाग आहेत.त्यांना टी २० सामन्यासाठी ७० हजार २९१ रुपये, वनडेसाठी १ लाख ५४ हजार ६४१ रुपये आणि कसोटीसाठी २ लाख १० हजार ८७४ रुपयांसारखी मोठा रक्कम मिळते. तर, त्यांची वार्षिक पगार ही २४ लाख ६० हजार २०२ रुपये इतकी आहे.













































































