Last Updated on 24 Feb 2025 6:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांनी भारत देशात सर्वात प्रथम पुणे येथील लाल महालात तळ ठोकलेल्या शाहिस्तेखानावर सर्जिकल स्ट्राईक केला आहे,असा विश्वास प्रसिध्द शिव व्याख्याते निलेश चव्हाण (छत्रपती संभाजी नगर ) यांनी इस्लामपूर व रेठरेधरण येथे बोलताना व्यक्त केला. इस्लामपूर येथे लोक शाहीर अण्णाभाऊ साठे लेझीम पथक व मर्दानी खेळ पथकाच्या दांडपट्टा,तलवार व कुऱ्हाडीच्या खेळाने उपस्थित प्रभावित झाले.
युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाळवा तालुक्यातील १४ गावात ‘शिव जयंती व्याख्यानमाला’उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या समारोप व्याख्यानात ते बोलत होते. इस्लामपूर येथे प्रा.शामराव पाटील,माजी नगराध्यक्ष अँड. चिमणभाऊ डांगे,पै.भगवान पाटील,सौ. अरुणाकाकी पाटील,मुनीर पटवेकर,माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,माजी सभापती खंडेराव जाधव,शंकरराव चव्हाण, रेठरेधरण येथे लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील,माजी पं.स.सदस्य शामराव पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
निलेश चव्हाण पुढे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत,स्वाभिमान आहेत आणि आपल्याच राज्यात त्यांचा पुतळा पडतोच कसा? राजांनी आयुष्यभर आपल्या राज्यातील स्त्रियांच्या बरोबर शत्रू पक्षातील स्त्रियांचा सन्मान ठेवला. मात्र आपल्या राज्यात बदलापूर सारख्या घटना घडणे लाजिरवाणे आहे. युवा पिढीने राजांचे वारसदार म्हणून आता आपल्या बहिणींच्याबरोबर दुसऱ्यांच्या बहिणींच्या रक्षणासाठी सज्ज व्हायला हवे. राजांच्यावर इतकी संकटे आली, तरी ते कधी डगमगले नाहीत. त्यांनी प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड दिलेले आहे. त्यांनी प्रत्येक लढाई आणि चढाईत वेग-वेगळे तंत्र वापरले आहे. आता ढाल-तलवारीची नव्हे,तर बुध्दीची लढाई आहे,याची जाणीव युवकांनी ठेवावी.
इस्लामपूर येथे शहर सरचिटणीस अभिजित रासकर यांनी स्वागत,सदस्य अकबर मुंडे यांनी प्रास्ताविक केले. संघटक सागर पोतदार यांनी आभार मानले. विश्वास राव पाटील,पुष्पलता खरात,रोझा किणीकर, रतन रायगांधी,सचिन कोळी,दत्ता फल्ले, सागर चव्हाण,मोहन भिंगार्डे,अंकुश जाधव यांच्यासह युवक नागरिक उपस्थित होते. युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील,उपाध्यक्ष अभिजित कुर्लेकर,सरचिटणीस अभिजित रासकर व युवकांनी संयोजन केले.
रेठरेधरण येथे लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपसरपंच मदन पाटील,माजी उपसरपंच जगन्नाथ घेवदे,पोलीस पाटील उमेश बनसोडे,योगेश पाटील,राजेंद्र पाटील, मोहन पाटील,अधिक पाटील,रविंद्र पाटील, यशवंत वाघमारे,शंकर पवार,राज पाटील, तसेच सुरूलचे संघाचे संचालक बंडा नांगरे, सुशांत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. शिवराज पाटील यांनी आभार मानले.
प्रतिकदादांची संकल्पना आणि उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून प्रथमच पेठ,आष्टा,बागणी,क.डिग्रज,नेर्ले, कामेरी,बावची,वाळवा,रेठरेहरणाक्ष, बोरगाव,ऐतवडे खुर्द,येलूर आदी १४ गावात ‘शिव जयंती व्याख्यानमाला’राबविण्यात आली. युवा शिव वक्ते निलेश जगताप (जेजुरी) व निलेश चव्हाण (छत्रपती संभाजी नगर) यांची ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य व आजचा महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्याने झाली. या व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.









































































