Last Updated on 18 Jan 2025 4:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट चाहत्यांची अखेर अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे.
बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील पत्रकार परिषदेतून अजित आगरकर यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंची नावं जाहीर केली. निवड समितीच्या बैठकीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीपुर्वी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माला अपेक्षितपणे संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. शुभमन गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळाले आहे, तर संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेले नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या उपस्थितीत गोलंदाजी विभाग मजबूत करण्यात आला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण ८ संघ सहभागी होतील, ज्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. टीम इंडिया ‘अ’ गटात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबत आहे. साखळी फेरीत भारत या तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे भारतीय संघाचे सामने युएईत खेळवले जातील.
15 सदस्यीय भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप. यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गट :
गट अ – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
गट ब – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सामने :
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
हॅशटॅग्स:
#TeamIndia #ChampionsTrophy2025 #Cricket #BCCI #IndianCricket








































































