Last Updated on 17 Feb 2021 4:29 PM by
‘हे’ 5 गुण दर्शवतात चतुराई
महान राजनीतीज्ञ आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतींमध्ये मानवी आयुष्य चांगले करण्यासाठी आणि सफल करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपले ज्ञान आणि दूरदृष्टीच्या आधारे त्यांनी या नीती तयार केल्या. यात मानवी विचार,कर्म आणि स्वभावावर आधारित विचार आहेत आणि या नीती आजही प्रासंगिक आहेत. यामध्ये चाणक्याने अशा गुणांचा उल्लेखही केला आहे ज्यामुळे लोकांची खरी ओळख समोर येते. जाणून घ्या काय आहेत ते पाच गुण जे मनुष्याला बुद्धिमान बनवतात.
आपल्याबाबतची गुपिते करत नाहीत उघड
आपल्याशी संबंधित काही गोष्टी कुणालाच सांगू नयेत, कारण यामुळे पुढे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चाणक्य नीतीत याचा उल्लेख आहे की जे लोक आपल्या भविष्यातील योजनांबद्दल इतरांना सांगत नाहीत त्या खऱ्या समजूतदार व्यक्ती असतात.
अडचणींच्या काळात दुःखी राहात नाहीत
आचार्य चाणक्यांच्या मते लोकांनी अडचणींच्या काळात धीर धरायला हवा आणि मन विचलीत होऊ देता कामा नये. कारण कठीण काळातच त्यांना आपल्यातल्या गुणांची जाणीव होते आणि तेच लोक बुद्धिमान समजले जातात.
योग्य मार्गावर चालतात
चाणक्यांचे म्हणणे आहे की योग्य मार्गावर चालून जे लोक कठीण परिस्थितीचा सामना करतात ते बुद्धिमान असतात. ज्या व्यक्ती इमानाने आणि चांगल्या मनाने कार्य पूर्ण करतात ते नेहमीच विवादांपासून दूर राहतात. जे लोक गैरप्रकारांपासून दूर राहतात ते चाणक्यांच्या मते समजदार आणि बुद्धिमान असतात.
अडथळ्यांना घाबरत नाहीत
चाणक्य सांगतात की जे लोक अडथळे पार करायला घाबरत नाहीत ते बुद्धिमान असतात. असे लोक कोणत्याही चिंता किंवा काळजीविना आपले काम करतात. कारण अडचणी येत जात राहतात, पण अशा परिस्थितीत संयम राखणे महत्वाचे असते.
धर्माच्या मार्गावर चालतात
चाणक्य सांगतात की जे लोक धर्माशी जोडून घेऊन विलासी जीवनाचा त्याग करतात ते सदैव योग्य मार्गावर राहतात. त्यांनाच खऱ्या अर्थाने बुद्धिमान म्हटले जाते.














































































