Last Updated on 17 Feb 2021 4:28 PM by
…नाही तर करावा लागतो पश्चाताप
आचार्य चाणक्य यांच्या नीती या आजच्या काळातही तितक्याच लागू होत आहेत. त्यांचे एक एक वाक्य सत्याच्या जवळ जातात. त्यात पुरूषांनी कोणत्या गोष्टी गुपीत ठेवल्या पाहिजे हे सांगितले आहे.
पैशा संबंधी मोठे नुकसान
कोणत्याही व्यक्तीने आपल्या पैशासंदर्भातील नुकसानाबाबत कोणत्याही इतर बाहेरच्या व्यक्तीला नाही सांगितले पाहिजे. कोणताही बाहेरच्या व्यक्ती तुमची मदत करणार नाही. उलट तुमच्याकडे पैसे नसल्याने तुम्हांला तो दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल.
आपल्या बायकोची तक्रार
पती पत्नीच्या खासगी गोष्टी केवळ त्यांच्यात राहिल्या पाहिजे. जर पती आपल्या पत्नीशी संबंधीत नकारात्मक गोष्टी दुसऱ्यासोबत शेअर करत असेल तर लोक पत्नीचीही थट्टा करतात. नंतर पत्नीला आपला स्वभावात सुधारणा केली तर तुमची थट्टा होते.
दुख किंवा अडचण
अनेक लोकांना सवय असते की आपल्या अडचणी या दुसऱ्यांसमोर गायला लागतात. कोणत्याही व्यक्तीला तुमच्या अडचणींशी काही देणेघेणे नसते. तुमच्या पाठीमागे तुमच्या अडचणीची थट्टा करणारे खूप असतात.
एखाद्या मुर्खाने केलेला अपमान
एखाद्या मुर्खामुळे तुम्हाला अपमानीत व्हावे लागले असेल तर अशी घटना कोणालाही सांगू नका. ती जर सांगितली तर तुमच्याबाबतचा आदर कमी होईल.
चाणक्याचा खास सल्ला…
चाणक्यानुसार आपला अंहकार आत्मविश्वास कमी करतो याचे संकेत आहे. जितके शक्य असेल तितके याला कमी करा. नाही तर एक दिवशी तुम्हीच लोकांच्या हसण्याचा विषय बनाल.











































































