Last Updated on 11 Sep 2025 3:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना त्यांच्या स्वतःच्या विद्यमान कर्तव्यांसोबतच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी नियुक्त केले आहे.
सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे, ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, अखेर ही प्रतीक्षा आता संपली आहे.गुजरातचे राजपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
आचार्य देवव्रत हे एक शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत, ते सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत. दरम्यान ते यापूर्वी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील होते. आचार्य देवव्रत हे हिमाचल प्रदेशचे जवळपास चार वर्ष राज्यपाल होते. 2015 पासून ते 2019 पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर ते 2019 मध्ये गुजरातचे राज्यपाल झाले, आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचा देखील पदभार सोपवण्यात आला आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 22 Jan 2026 7:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरा... Read more












































































