Last Updated on 05 Jun 2020 3:37 PM by
पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. तुम्ही ताजेतवाणे होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे
गरम पाणी पिण्याचे फायदे
१) गरम पाण्याने अंघोळ केल्याने थकवा नाहीसा होतो. त्वचा उजळवण्यासाठी व त्वचेसंबंधी रोग दूर करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करणे उपयोगी मानले जाते.
२) दिवसभर मेहनत केल्यावर थकवा घालवण्यासाठी गरम पाणी फायद्याचे आहे.
३) दररोज कोमट पाणी पिल्याने अधिक ताजेपणा जाणवतो.
४) गरम पाण्याचा उपयोग वजन कमी करणे, रक्तप्रवाह सुरळीत करणे व रक्तप्रवाह संतुलित ठेवण्यासाठी केला जातो.
५) गरम पाण्यासोबत लिंबू व मध घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन कमी करण्यासाठीही हा उपाय गुणकारी आहे.
६) श्वसनासंबंधित रोग असल्यास थंड पाणी पिऊ नये.
७) गरम पाणी हाडे व स्नायूंच्या दुखण्यासाठीही आवश्यक आहे. कोमट पाण्याने स्नायूबंधांमधील घर्षण कमी होण्यास मदत होते. यामुळे भविष्यात संधिवात होण्याची शक्यता कमी होते.
८) तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले. गरम पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो. सर्दी असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो.
९) महिलांना मासिक पाळीच्यावेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी प्या. त्यामुळे पोट दुखीवर आराम मिळतो.










































































