Last Updated on 01 Nov 2021 3:22 AM by Sanjay Patil/Adhorekhit
आपल्या देशात दर महिन्याच्या एक तारखेला काही ना काही बदल किंवा नवे नियम लागू होत असतात. त्याच धर्तीवर आजपासून काही बदल होत आहेत. यापैकी काही बदलांमुळे तुमचा खर्च वाढू शकतो, तर काही बदल तुमच्या सुरक्षेसाठी केले जात आहेत. त्यामुळे या सगळ्या बदलांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
1 सप्टेंबरपासून बदलाव होणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये LPG, Home Loan, EMI, Airlines यांच्यासह आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट आहेत.

LPG सिलेंडरच्या दरात बदल
तुम्ही गॅस डिलरकडे नोंदवलेला तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर जर चुकीचा असेल तर तुमच्या एलपीजी गॅस सिलिंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा बदल एलपीजी गॅस सिलिंडरच्या बाबतीत झाला आहे. तो म्हणजे तुम्ही सिलिंडरची बुकिंग केल्यावर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे. ज्यावेळेस एलपीजी गॅस सिलिंडर घेऊन कर्मचारी येईल तेव्हा तुम्हाला तो ओटीपी त्याला द्यावा लागेल त्यानंतर सिस्टममध्ये तो अपडेट होईल आणि त्यानंतरच तुम्हाला सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार आहे.
रेल्वेचे नवीन वेळापत्रक आजपासून लागू होणार
आज पासून रेल्वेच्या वेळापत्रक बदल होणार आहे. रेल्वेचे नवीन वेळापत्रक आजपासून लागू होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बाहेरगावी जाण्याचे नियोजन करत असाल तर रेल्वेगाड्यांच्या बदलेल्या वेळांची दखल घ्या. देशात धावणाऱ्या सुमारे ३० राजधानी गाड्यांच्या वेळाही आजपासून बदलणार आहेत.
बँकांना पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार
शुल्क आकारण्यासाठी बँकांना पैसे जमा करावे लागतील. आता बँकांना पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. बँक ऑफ बडोदाने याची सुरुवात केली आहे. आजपासून विहित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग केल्यास वेगळे शुल्क आकारले जाईल.आज पासून ग्राहकांना कर्ज खात्यासाठी १५० रुपये भरावे लागतील, त्यानंतर महिन्यातून तीन वेळा पैसे काढले जातील. बचत खात्याबद्दल बोलायचे झाल्यास, अशा खातेदारांना तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु जर ग्राहकांनी चौथ्यांदा पैसे जमा केले तर त्यांना ४० रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर जन धन खातेधारकांना यात काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांना जमा करण्यावर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, परंतु पैसे काढल्यावर १०० रुपये द्यावे लागतील.

गॅस बुक करण्यासाठी एक नवीन क्रमांक
जर तुम्ही इंडेन ग्राहक असाल तर आजपासून तुम्हाला जुन्या नंबरवर गॅस बुक करता येणार नाही. इंडेनने त्यांच्या एलपीजी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर गॅस बुक करण्यासाठी एक नवीन क्रमांक पाठवला आहे. आता इंडेन गॅसच्या ग्राहकांना एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.

WhatsApp काही आयफोन आणि अँड्रॉईड फोनवर काम करणे बंद
आजपासून WhatsApp काही आयफोन आणि अँड्रॉईड फोनवर काम करणे बंद करणार आहे. WhatsApp वर दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून फेसबुकच्या मालकीचा हा प्लॅटफॉर्म Android 4.0.3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही.
विमान प्रवास महागणार
1 सप्टेंबरपासून विमान प्रवास महाग होईल. नागरी उड्डाण मंत्र्यांनी (Civil Aviation Ministry) 1 सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून विमान सुरक्षा शुल्क (ASF)आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ASF शुल्कामध्ये देशांतर्गत प्रवाशांसाठी 150 रुपयांऐवजी 160 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून 4.85 डॉलर ऐवजी 5.2 डॉलर वसूल केले जातील.
मोरटोरियम संपल्यामुळे EMI वाढणार
EMI देणाऱ्या ग्राहकांसाठी हे महत्त्वाचे आहे. कारण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून EMI चुकता करण्यासाठी सवलत देण्यात आली होती. ती 31 ऑगस्ट रोजी समाप्त झाली आहे. एसबीआय आणि पीएनबीकडून पुढील आठवड्यात निर्णय होईल. ही सवलत वाढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
जीएसटी भरपाई करण्यास विलंब झाल्यास 18 टक्के व्याज
सरकारने अशी माहिती दिली आहे की, जीएसटी भरण्यास विलंब झाल्यास 1 सप्टेंबरपासून एकूण कर देयकावर व्याज आकारले जाईल. या वर्षाच्या सुरूवातीला जीएसटी देयकास उशीर झाल्यामुळे सुमारे 46000 कोटी रुपयांच्या थकीत व्याज वसुलीच्या निर्देशासंदर्भात या उद्योगाने चिंता व्यक्त केली होती. एकूण देयतेवर व्याज आकारले जाते. केंद्रीय आणि राज्य अर्थमंत्री यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेच्या 39 व्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की 1 जुलै 2017 पासून जीएसटी देयकास उशीर झाल्याच्या एकूण कर देयकावर व्याज आकारले जाईल आणि त्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. तथापि, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) 25 ऑगस्ट रोजी सूचित केले की 1 सप्टेंबर 2020 पासून एकूण कर देयकावर व्याज आकारले जाईल.
शेअर बाजारात पैसे लावणाऱ्यांसाठी बदलले नियम
शेअर बाजारात (Indian Stock Market) आजपासून सामान्य गुंतवणूकदारांसाठी मार्जिनचे नवे नियम लागू होत आहेत. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ब्रोकरकडून मिळणाऱ्या मार्जिनचा लाभ आता गुंतवणूकदार घेऊ शकणार नाहीत. जेवढे पैसे ते अपफ्रंट मार्जिनसाठी ब्रोकरला देतील, तेवढ्याचेच शेअर ते खरेदी करू शकतील. शेअर बाजार रेग्यूलेटर सेबीने मार्जिन ट्रेडिंग नव्याने रचले आहे. आतापर्यंतच्या प्लेज सिस्टिममध्ये गुंतवणूकदारांची भूमिका कमी आणि ब्रोकरेज हाऊसची जास्त असायची. गुंतणूकदारांकडून अनेक कामं तेच करून घ्यायचे. नवीन कार्यपद्धतीमध्ये शेअर तुमच्या खात्यामध्येच राहतील आणि तिथेच क्लिअरिंग हाऊस प्लेज मार्क करेल. यामुळे ब्रोकरच्या खात्यात स्टॉक जाणार नाही. मार्जिन निश्चित करणे तुमच्या हातात असेल.














































































