Last Updated on 14 Jul 2025 5:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरणात एकूण पाणीसाठा 74.29 टीएमसी (70.58 टक्के) झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आहे. त्यामुळं कोयना धरणात प्रति सेकंद 10,674 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. उद्या दि. 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंच उघडून 5000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे
कोयना धरणातील आजचा पाणीसाठा, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस, धरणामध्ये येणारा येवा आणि उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेता कोयना जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडणे आवश्यक आहे.
उद्या दि. 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंच उघडून 5000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे
कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 7100 क्युसेक विसर्ग सुरू होईल. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
या धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. पायथा ग्रहातून 1050 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे. कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला 1 जूनपासून प्रारंभ झाला. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळं यंदा वीजनिर्मितीसह पुर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला. 31 मे अखेर धरणात 17.80 टीएमसी (17.77 टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 33 मिलिमीटर, नवजा येथे 62 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 42 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 74.29 टीएमसी इतका झाला असून धरण 70.58 टक्के भरले आहे.











































































