Last Updated on 16 Jul 2025 8:50 AM by Sanjay Patil/Adhorekhit
धरणातून 5 हजार 500 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु
सातारा । राज्याला प्रकाशमान करणारे आणि शेतकरी, उद्योग विश्वाचा कणा असलेल्या आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज (मंगळवारी) धरणाचे सहाही वक्र दरवाजे दीड फुटाने उघडण्यात आले आहेत. धरणातून प्रतिसेकंद 5 हजार 500 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरणात एकूण पाणीसाठा 75.48 टीएमसी (71.71 टक्के) झाला आहे. मे महिन्यापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात दरवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळं कोयना धरणात प्रति सेकंद 15,819 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. आज सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंच उघडून 3400 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आले.
कोयना धरणातील आजचा पाणीसाठा, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस, धरणामध्ये येणारा येवा आणि उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेता कोयना जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडणे आवश्यक होते.
गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत. त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सांडव्यावरून विसर्ग सुरू झाल्यानंतर धरणातून एकूण 5500 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
या धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 103 मिलिमीटर, नवजा येथे 134 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 92 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. स












































































