Last Updated on 19 Nov 2021 6:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.याचा आनंदोत्सव साजरा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज,शुक्रवारी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली.
केंद्र सरकारने काही महिन्यांपुर्वी तीन कृषी कायदे संसदेत पारित केले होते. त्या कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता.सुमारे आठ दहा महिन्यांपासून पजांब दिल्ली,हरियाणासह अनेक राज्यातील शेतकरी सीमाभागात ठाण मांडून आंदोलन करत होते.देशभरातल्या शेतकर्यांसोबतच राज्यातीलही शेतकरी याबाबत वेळोवेळी शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आले होते.त्याचाच परिपाक म्हणून आज या केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले.पंतप्रधान मोदींनी या कायद्यांच्या स्थगितीची घोषणा केलीयाचा आनंदोत्सव साजरा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर तहसीलदार कार्यालया समोर शेतकऱ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव म्हणाले,”तीन कायद्यांना स्थगिती मिळणे हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा,संघर्षाचा,जिद्दीचा विजय आहे.अखेर सामान्य शेतकर्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे.आता इथुनपुढचा लढा हा दीडपट हमीभावाचा राहणार आहे.. आदरणीय राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एक व्यापाक लढा ऊभारु शेतकरी व शेतीमालाला योग्य भाव यासाठी कटिबद्ध राहु .
काँम्रेड दिग्विजय पाटील म्हणाले,मोदी सरकारने उशीर सुचलेल शहाणपण आहे, कायदा ताबडतोब बद्दल करावा.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य आप्पासाहेब पाटील,अनिसचे प्रा.विजयकुमार जोखे,शहराध्यक्ष अनिल करळे,प्रवक्ते एस्.यु सन्दे,प्रहार संघटनेचे दिग्विजय पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.










































































